Exam Alert : मोठी बातमी!! अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाचा जोर सुरू आहे. या (Exam Alert) अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी दिली आहे.

मार्च, एप्रिल 2022 मधील सर्व जभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर सुरू आहेत विद्यापीठ परिक्षेत्रातील जिल्हयामध्ये उदभवलेल्या पूर परिस्थीतीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्या – जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच काही भागामध्ये विजेचा पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे तसेच इंटरनेट कनेक्शनचा अडथळा देखील (Exam Alert) उद्भवू शकतो. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दि. 10 व 11 ऑगस्ट, 2022 रोजी होणा-या सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. तसेच स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक शिवाजी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल; याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवायचे आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com