‘इथिओपिया’चा पहिला स्पेस सॅटेलाइट लाँच; स्वतःचा उपग्रह असणारा अफ्रिकेतील 11 वा देश

करीअरनामा । इथिओपिया देशाने आपला पहिला उपग्रह (स्पेस सैटेलाईट) प्रक्षेपित केला. जो देशाच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वाची उपलब्धी असून आफ्रिकन अंतराळ उद्योगासाठी एक महत्वपूर्ण बॅनर वर्ष ठरणार आहे. इथिओपियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (ईटीआरएसएस) चे प्रक्षेपण चीनमधील अवकाश स्थानकात झाले.

या प्रक्षेपणामुळे इथिओपिया 11 वा आफ्रिकेचा देश बनला आहे की जो स्वतःचा उपग्रह अवकाशात ठेवेल.1998 मध्ये इजिप्त पहिला देश ठरला होता.

इथिओपियाच्या उपग्रहाद्वारे प्रदान केलेल्या आकडेवारीतून देशातील शेती, वनीकरण आणि खाणकाम संसाधनांचे संपूर्ण चित्र उपग्रहच्या मदतीने रेखाटले जाईल आणि पूर व इतर आपत्तकालीन स्तिथी मध्ये या उपग्रहाचा चांगला उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————