पत्रकार व्हायचंय? पुणे विद्यापीठ (रानडे इन्स्टिटयूट) ची प्रवेश प्रक्रिया सुरु; ‘असा’ करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन | पत्रकारितेमध्ये करिअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जर आपणही पत्रकारितेमध्ये नोकरी-करियर करू इच्छित असाल तर, पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग विभागातील पदव्यूत्तर पदवी आणि डिप्लोमा कोर्सेस यासाठी उत्तम पर्याय आहेत.

कमी खर्चामध्ये दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग (रानडे इन्स्टिट्यूट) मधील विविध कोर्स नावाजलेले आहे. यामध्ये एमए (जेएमसी) म्हणजेच पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. याची संपूर्ण माहिती आपण यामध्ये पाहू,

1) एमए (जेएमसी)
: मास्टर्स ऑफ आर्टस् – जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन
कालावधी: दोन वर्ष
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक

एमए (जेएमसी) साठी ऑनलाइन प्रवेशासाठीचा अभ्यासक्रम व गुणववभागणी पुढीलप्रमाणे असेल,
एकूण गुणः 100 (विभाग अ: 20 गुण, विभाग ब: ८० गुण)
वेळ: एक तास
विभाग अ: सामान्य योग्यता पेपर (प्रत्येकाच्या एका चिन्हाचे 20 बहुविकल्पी प्रश्न)
विभाग ब: कोर्स-विशिष्ट पेपर (दोन गुणांच्या 40 बहुविध निवडीचे प्रश्न)

2) मास मीडिया मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा

कालावधी: एक वर्ष, संध्याकाळ, अर्धवेळ डिप्लोमा कोर्स
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक

पदव्यत्तुर वत्तृ पत्रववद्या अभ्यासक्रम (PGDJ) ऑनलाइन प्रवेशासाठीचा अभ्यासक्रम व गुणववभागणी पुढीलप्रमाणे असेल,

एकूण गुणः १०० (विभाग ए: २० गुण, विभाग ब: ८० गुण)

विभाग एः सर्वसाधारण कल चाचणी (प्रत्येकी दोन गुणांचे एकूण १० बहुपर्यायी प्रश्न)
(यात तर्कसंगत विचारसरणी, मलूभूत गणित, निरीक्षण यांवर आधारित प्रश्न विचारण्यात येतील.)

विभाग बीः विषयानुसार आधारित चाचणी (प्रत्येकी दोन गुणांचे एकूण ४० बहुपर्यायी प्रश्न)

3) पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रम
कालावधी: एक वर्ष, एका वर्षाचा, फक्त मराठी भाषेतून सकाळच्या वेळात चालणारा अंशकालीन अभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रता: पदवी

हे पण वाचा -
1 of 5

ऑनलाइन प्रवेशासाठीचा अभ्यासक्रम व गुणववभागणी पुढीलप्रमाणे असेल,

एकूण गुणः १०० (विभाग ए: २० गुण, विभाग बीः ८० गुण)

विभाग एः सर्वसाधारण कल चाचणी (प्रत्येकी दोन गुणांचे एकूण १० बहुपर्यायी प्रश्न)
(यात तर्कसंगत विचारसरणी, मलूभूत गणित, निरीक्षण यांवर आधारित प्रश्न विचारण्यात येतील.)

विभाग बीः विषयानुसार आधारित चाचणी (प्रत्येकी दोन गुणांचे एकूण ४० बहुपर्यायी प्रश्न)

4) फोटो जर्नलिझम मध्ये पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कालावधी: सहा महिने
शैक्षणिक पात्रता: बारावी

अर्ज करण्याची सुरुवात: 14 जून 2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 जुलै 2021
विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10-7-2021

अधिकृत वेबसाइट: http://www.unipune.ac.in
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन माध्यमातून होणार असून, प्रवेश परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण हे नंतर पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरती कळवले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळोवेळो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाइट पाहणे आवश्यक आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com