‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ उपक्रमांतर्गत १ ली ते ८ विच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचे अतिरिक्त वर्ग सुरु होणार

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण विभागाच्या शाळा बंद, अभ्यास सुरू उपक्रमानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता इंग्रजीचे अतिरिक्त वर्ग घेण्यात येणार आहेत. पाठय़पुस्तकातील घटकांबरोबर संभाषण, लेखन यांचे मार्गदर्शन दूरचित्रवाणीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

करोनाकाळात शाळा बंद झाल्यानंतर ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ उपक्रम विभागाने सुरू केला. दीक्षा अ‍ॅप, यू-टय़ूब अशा माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत रोज उपक्रम, अभ्यास, पाठय़घटक पोहोचवण्यात येत होते. त्याचबरोबर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

‘विद्यार्थ्यांना इंग्रजीची धास्ती वाटते. ऑनलाइन वर्गामध्येही अनेक ठिकाणी शिक्षकांना इंग्रजीच्या तासिका घेण्यात अडचणी येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे पर्यायही उपलब्ध नाहीत. कित्येक कुटुंबांमध्ये पालक इंग्रजीचा अभ्यास करून घेऊ शकत नाहीत.  म्हणून विशेष तासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे,’ असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

४ जानेवारीपासून सोमवार ते गुरुवार दुपारी ३.३० वाजता या तासिका सुरू सुरू होतील. पाठय़पुस्तकातील घटक, व्याकरण याबरोबरच संभाषण कौशल्य, लेखन याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येईल. पाठय़पुस्तक आणि पाठय़ेतर घटकांवरील एकूण २०९ तासिका प्रक्षेपित करण्यात येतील.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com