अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी १५ डिसेंबर रोजी जाहीर झाली. या यादीत ज्या उमेदवारांना महाविद्यालय अलॉट झाले आहे, त्यांनी १८ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

अल्पसंख्याक, इनहाऊस कोट्यातील जागा सरेंडर करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना १८ आणि १९ डिसेंबरपर्यंतचा अवधी आहे. त्यानंतर २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रवेशांच्या विशेष फेरीसाठी जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, अकरावी ऑनलाइन प्रवेशांची दुसरी यादी शनिवारी ५ डिसेंबर रोजी जाहीर झाली. या यादीत मुंबई विभागातील महाविद्यालयांमध्ये सर्व शाखांच्या मिळून एकूण १,४७,०३३ जागा (आरक्षण वगळून) दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या. एकूण १,५८, ८१० विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, यापैकी ७६,२३१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले.

अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com