मराठा आरक्षण स्थगितीचा अकरावी प्रवेश प्रक्रियेला फटका; दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं शैक्षणिक प्रवेशासाठीच्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे, अकरावीचे प्रवेश आता लांबणीवर गेले आहेत. इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे आज जाहीर होणारी अकरावी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली आहे.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ अंतर्गत नियमित प्रवेश फेरी-२ ची गुणवत्ता, निवड यादी (Allotment) आज जाहीर केली जाणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालय SEBC आरक्षण संदर्भातील आदेशाचे अनुषंगाने यापुढील इयत्ता ११वी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली आहे. ११वी प्रवेश प्रक्रिये बाबत पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

हे पण वाचा -
1 of 3

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला जाहीर झाली होती. मुंबईभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून पुढली पावले उचलली जाणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: