Educational Scholarship : ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजने’साठी अर्ज करण्याचं आवाहन; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात शिक्षण घ्यायला कोणाला (Educational Scholarship) नाही आवडणार? पण परदेशी जायचं म्हटलं तर सर्व सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना पैशासाठी फार ओढाताण करावी लागते किंवा पैशा अभावी परदेशी शिकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. अशा विद्यार्थ्यांसाठी एखादी स्कॉलरशिप संजीवनी ठरते. स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे परदेशी शिकण्याचे स्वप्न साध्य होवू शकते. अशीच एक योजना आहे ‘राजर्षी शाहू परदेशी शिष्यवृत्ती योजना’. ही योजना सध्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी उपयुक्त ठरत आहे. महत्वाचे म्हणजे 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी शासनाकडून बरेच प्रयत्न केले जातात. त्यामुळेच सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागामार्फत ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना’ राबवली जात आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील (Educational Scholarship) विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी ही राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती दिली जाते. 2003 पासून सुरू असणाऱ्या या योजनेद्वारे पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका (PG Diploma), त्याचबरोबर PhD चे शिक्षण घेण्याकरिता ही शिष्यवृत्ती दिली जाते. या माध्यमातून महाराष्ट्रातील 75 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

12 जुलै पर्यंत करता येणार अर्ज (Educational Scholarship)
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर होते. यासाठी विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार केली जाते. यापैकी 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव असतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 75 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दि. 12 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
1. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज डाऊनलोड करायचा आहे.
2. पुढे अर्ज भरुन तो आवश्यक कागदपत्रांसह, समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्त्यावर पाठवायचा आहे. (Educational Scholarship)
3. जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर 75 विद्यार्थी योजनेसाठी निवडले जातात.
4. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमानप्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च यांचा लाभ मिळतो.

‘या’ अटी पूर्ण कराव्या लागतील
1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनूसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष आणि पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा आहे.
3. तसेच भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या (Educational Scholarship) संकेतस्थळावरील एमडी आणि एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असतील.
4. इच्छुक विद्यार्थ्यांना परदेशातील जागतिक रँकिंगमधील 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा.
5. विद्यार्थ्यांने विहीत कालावधीत अभ्यासक्रम पुर्ण करणेही बंधनकारक आहे.
या शिष्यवृत्ती बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकते. तसेच लवकरात लवकर यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com