Education : खुशखबर!!वंचित मुलांना परदेशी शिक्षणाची संधी, ‘एकलव्य’ संस्थेनं घेतला पुढाकार

करिअरनामा ऑनलाईन। भारतात वंचित घटकातून येत असलेल्या पहिल्या पिढीतील (Education) विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. आता वंचित घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य संस्थे’च्या माध्यमातून मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व मार्गदर्शन मोफत असून, अशाच वंचित घटकातून उच्च शिक्षण पूर्ण केलेले मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

1,000 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्याचा एकलव्यचा मानस

देशभरातील, वंचित समूहातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना ‘एकलव्य’ ही संस्था मार्गदर्शन करत असते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी संस्थेतर्फे, ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स’ हा प्रोग्रॅम राबवला जातो. या संस्थेचे संस्थापक, जे स्वतः पहिल्या (Education) पिढीतील शिक्षण घेत असलेले व्यक्ती आहेत.. श्री. राजू केंद्रे यांना मागील वर्षी प्रतिष्ठेची चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली होती. यामुळे त्यांना लंडन येथे जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या परदेशी शिक्षणासारखीच संधी अनेकांना मिळावी म्हणून ‘ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम’ एकलव्य ने सुरु केला आहे. अशा कार्यक्रमातून येत्या दहा वर्षात 1,000 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्याचा एकलव्यचा मानस आहे.

यंदाच्या वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकलव्यने ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम’ची सुरुवात केली. हा प्रोग्रॅम तळागाळातील उपेक्षित समूहाच्या, पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, यु.के. आणि युरोपात, मानविकी आणि सामाजिक विज्ञान, मीडिया आणि कायदा अशा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि पी.एच.डी मार्गदर्शनासाठी सुरु केला गेला. पुढील काही वर्षांमध्ये अमेरिका आणि इतर देशांमधल्या अर्जांच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा एकलव्य विस्तार करणार आहे.

असं मिळतं मार्गदर्शन – (Education)

एकलव्य ग्लोबल स्कॉलर्सचे पहिले निवासी शिबीर जुलै २०२२ मध्ये वर्धा येथे आयोजित केले गेले. बूटकॅम्प, ऑनलाईन कार्यशाळा आणि अनेक चर्चासत्रे याद्वारे परदेशातील विद्यापीठे आणि स्कॉलरशिपसाठी लागणाऱ्या अर्जाचे मार्गदर्शन, IELTS प्रशिक्षण, स्टेटमेंट ऑफ पर्पजचे लेखन, लेटर्स ऑफ रिकमेंडेशन, व्हिजा सुविधा या सगळ्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले गेले. एका विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक, अशा (Education) पद्धतीने एकलव्य १८ राज्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांबरोबर काम करत आहे. जिथे ९० मार्गदर्शक मार्गदर्शन करत आहेत. जे भविष्यातील स्कॉलर्सला मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे मार्गदर्शक वन टू वन मेंटरिंग करण्यास एकलव्यला मदत करत आहेत. चेवेनिंग शिष्यवृत्ती अर्जांसाठीसुद्धा त्यांची खूप मदत झाली आहे. यंदा GSP कोहर्टच्या ५०हून अधिक विद्यार्थ्यांनी चेवेनिंग शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. एकलव्यला आशा आहे की, यंदा एकलव्य मधील चेवेनिंग स्कॉलर्सची संख्या दुहेरी अंकात असेल.

हे आहेत मार्गदर्शक

या दुसऱ्या शिबिरात अदिती प्रेमकुमार (ऑक्सफर्ड विद्यापीठ), अनिश गवांडे (कोलंबिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ), आशीर्वाद वाकडे (शिकागो विद्यापीठ), भीमाशंकर शेतकर (जर्मन चान्सलर फेलो), पवन कुमार श्रीराम (इरॅसमस मुंडस स्कॉलर), सौरभ वैती (कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलर), सुमित सामोस (ऑक्सफर्ड विद्यापीठ) हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.

टीप : ही कार्यशाळा सुरुवातीपासून GSPचा भाग असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. ज्यांना इच्छा असेल आणि जे विद्यार्थी  मार्गदर्शनाच्या शोधात आहेत असे विद्यार्थी पुढील शिबिरासाठी अर्ज करू शकतात. (Education)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com