Union Budget 2023 : अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; 157 नवीन कॉलेजेस आणि 8 हजार शिक्षक-कर्मचार्‍यांची भरती करणार 

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी (Union Budget 2023) सर्वसाधारण अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये शिक्षण आणि नोकरी क्षेत्राकडेही पूर्ण लक्ष देण्यात आले आहे. देशभरात १५७ नर्सिंग कॉलेज स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

देशभरातील एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये ३८ हजार ८०० शिक्षकांना पुनर्नियुक्त करण्यात येणार आहे. पुढील ३ वर्षात देशभरातील एकलव्य शाळांमध्ये ८ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. लहान मुले आणि तरुणांसाठी डिजिटल लायब्ररी तयार होईल. नॅशनल डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत उघडली जाईल. येथील पुस्तके स्थानिक आणि इंग्रजी (Union Budget 2023) भाषेत उपलब्ध असून येथे वयानुसार पुस्तके मिळतील. राज्यांना त्यांच्यासाठी थेट ग्रंथालये बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

फार्मामधील संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल. यामध्ये उद्योगपतींकडून गुंतवणूक अपेक्षित आहे. शिक्षणात नवीन अभ्यासक्रम आणले जातील. अद्ययावत संशोधनावर (Union Budget 2023) लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय शिक्षकांच्या प्रशिक्षणातही सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी एस व्हायब्रंट संस्थेत शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

करोना काळात झालेले अभ्यासाचे नुकसान भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू; असे यावेळी सांगण्यात आले. पुढील तीन वर्षांत, केंद्र ३.५ लाख आदिवासी विद्यार्थ्यांना (Union Budget 2023) सेवा देण्यासाठी ७४० एकलव्य शाळांसाठी एकूण ३८ हजार ८०० शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती करेल. नागरी सेवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य अपग्रेडेशनसाठी एकात्मिक ऑनलाप्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com