Education : B. A., B.Sc., B.Com ची पुस्तके आता मराठीतून; UGC चा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार फायदा

करिअरनामा ऑनलाईन । मातृभाषेतून शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना (Education) बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक व्याख्यांचे अर्थ कळत नाहीत. त्यामुळे घोकंपट्टी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. पण आता अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदी लागू करण्यासाठी सरकारकडून वेगाने प्रयत्न केले जात आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय NEP 2020 च्या तरतुदींपैकी एक असून त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात भाषेचा अडसर येणार नाही.

हे पण वाचा -
1 of 365

देशभरातील केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये चालवल्या जाणार्‍या विविध पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी (BA, BSc, BCom) ही तरतूद लागू केली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने यासंदर्भात एक नोटिफिकेशन जाहीर केले (Education) आहे. यूजीसीने देशभरातील आघाडीच्या पुस्तक प्रकाशकांसोबत एक बैठक आयोजित केली होती. हे पुस्तक प्रकाशक यूजी अभ्यासक्रमांसाठी पाठ्यपुस्तके प्रकाशित करतात.

या भाषांचा समावेश (Education)

यूजीसीच्या पुस्तक प्रकाशकांसोबत झालेल्या बैठकीबद्दल आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी माहिती दिली. बीए, बीएससी आणि बीकॉमच्या इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांच्या आवृत्त्या 12 भारतीय भाषांमध्ये (Education) प्रकाशित करण्यावर चर्चा झाली. या भाषांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

इंग्रजी माध्यमातील पुस्तके 12 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करण्याची यूजीसीची योजना आहे. सध्या प्रचलित पुस्तकांच्या अनुवादित आवृत्त्या या भाषांमध्ये प्रकाशित केल्या जाणार आहेत. या कामात विद्यापीठ अनुदान आयोग एक नोडल एजन्सी म्हणून काम करेल. यूजीसीकडून प्रकाशकांना पाठ्यपुस्तके ओळखण्यात आणि विषय तज्ञांसह त्यांचे संपादन करण्यात सहकार्य केले जाणार आहे.

आघाडीचे पुस्तक प्रकाशक बैठकीला उपस्थित (Education)

Under Graduate स्तरावरील अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके निर्धारित 12 भारतीय भाषांच्या अनुवादित आवृत्त्या प्रकाशित केल्या जाणार आहेत. यूजीसीने भारतीय लेखकांना या भाषांमध्ये प्रामुख्याने बिगर-तांत्रिक विषयांसाठी लिहिण्यासाठी प्रोत्साहित केल्याची माहिती यावेळी (Education) देण्यात आली. एस.चंद पब्लिशर्स, विकास पब्लिशिंग, न्यू एज पब्लिशर्स, युनिव्हर्सिटी प्रेस, पिअर्सन इंडिया, व्हिवा बुक्स, नरोसा पब्लिशर्स, महावीर पब्लिकेशन्स, टॅक्समन पब्लिकेशन्स, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आदी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.

काही महिन्यात मातृभाषेत मिळणार पुस्तक

येत्या काही महिन्यांत बीए, बीएससी आणि बीकॉमची पुस्तके भारतीय भाषांमध्ये अनुवादासह उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात असल्याची माहीती यावेळी (Education) यूजीसी अध्यक्षांनी दिली. बैठकीत सहभागी प्रकाशकांनी या राष्ट्रीय मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली याबद्दल आम्ही कौतुक करतो असेही ते म्हणाले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com