Education : अरे व्वा!! MPSC व UPSC मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदीसाठी मिळणार आर्थिक मदत; पुणे मनपाचा उपक्रम

करिअरनामा ऑनलाईन। पुणे शहरात कायमस्वरुपी वास्तव्यास असणाऱ्या आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Education) राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरीसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र ठरणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ व पुस्तकांच्या खरेदीसाठीअर्थ सहाय्य्य केले जाणार आहे. पुणे महानगरपालिकेने या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून रु. 5000/ एकवेळ डीबीटीद्वारे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. १०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास पदवी अथवा पदव्युत्तर परीक्षेतील (शेवटचे) गुण विचारात घेतले जातील. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

वरील योजनेसाठी अर्ज दि. 29 ऑगस्ट 2022 ते दि. 30 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर करायचे आहेत. या बाबतचा तपशील, अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात बघा.

योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याचा कालावधी – दि. 29 ऑगस्ट 2022 ते दि. 30 डिसेंबर 2022

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – dbt.pmc.gov.in

अधिक माहितीसाठी संपर्क क्र. – (020) 25501282/83

अधिक माहितीसाठी पहा – PDF

DBT PMC Notification 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com