शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त…

करिअरनामा । शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे माध्यमिक विभागासाठी मंजूर असलेली मुख्याध्यापकांची १७ पैकी १५ पदे अजूनही रिक्तच आहेत. तर दुसरीकडे महापालिका शाळेत प्रभारी मुख्याध्यापकपद सांभाळणारे तब्बल १५ सहाय्यक शिक्षक नऊ वर्षांपासून मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र या शिक्षकांची पदोन्नती करण्याकडे शिक्षण विभाग अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.

या शिक्षकांनी पदोन्नतीची वारंवार मागणी करूनही विभागामार्फत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आयुक्तांनीच लक्ष घालण्याची मागणी पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या शिक्षकांनी केली आहे.

विशेष म्हणजे प्रभारी मुख्याध्यापकपद सांभाळणाऱ्या सहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदाचा कोणताही आर्थिक व अन्य सेवाविषयक लाभ मिळत नाही. त्यामुळे या शिक्षकांचे आतापर्यंत किमान १० ते १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पदोन्नती समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करून माध्यमिक शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने मुख्याध्यापक संवर्गात पदोन्नती देण्याची मागणी प्रभारी मुख्याध्यापकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]