महापरीक्षेच्या पोर्टलमध्ये त्रुटी असल्याने भरती लांबणीवर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । राज्यात जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागांत एक लाख 64 हजार 338 कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारने 72 हजार रिक्‍तपदांची महाभरतीची घोषणा केली होती. या घोषनेनुसार पहिल्या टप्प्यात 34 हजार पदांची भरती डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन महापरीक्षा सेलतर्फे करण्यात आले होते. मात्र, महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी अन्‌ केलेल्या उपाययोजनांचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवला आहे. त्यामुळे महाभरती जानेवारीपर्यंत लांबणीवर गेली आहे.

पुणे, नागपूरसह अन्य जिल्ह्यांत मागील भरतीवेळी घोळ झाल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आता महापरीक्षा पोर्टल बंद होईल की काय, अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे महाभरतीची प्रकिया तत्काळ पूर्ण व्हावी. तसेच राज्यातील जवळपास 30 लाख सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीची संधी मिळावी. या हेतूने सरकारला ऑनलाइन पत्रव्यवहार करावा. असे आवाहन महापरीक्षा सेलकडून करण्यात आल्याची चर्चा विद्यार्थी करत आहेत.

लांबणीवर पडलेली भरतीची पदे –

1] ग्रामविकास – 11,000

2] आरोग्य – 10,000

3] कृषी – 2,500

4] गृह –7,000

5] सार्वजनिक बांधकाम – 837

हे पण वाचा -
1 of 351

6] पशुसंवर्धन – 1,047

7] नगरविकास – 1,664

एकूण – 34,048

_—-__

अधिक माहितीसाठी – http://www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: