दहावी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर ! DRDO मध्ये 1817 जागांची मेगाभरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । देशात मंदीचे वातावरण आहे. अशातच देशात अनेकांना नोकरी नाही. मात्र ऐन मंदीत  नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारनं नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. दहावी पास उमेदवारांसाठी डीआरडीओ 1817  जागांची भरती करत आहे. त्यामुळे तुम्ही दहावी पास असाल आणि तुमचं वय 18 ते 20 वयोगटात असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

डीआरडीओ (DRDO) म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत तब्बल 1817 पदांवर भरती केली जाणार आहे. ही पदं भरण्यासाठी डीआरडीओनं (DRDO) अर्जही मागवले आहेत. मल्टी टास्किंग स्टाफसाठी ही भरती  होणार आहे.

मान्यताप्राप्त संस्थेकडून दहावी पास केलेले विद्यार्थी या जागांसाठी अर्ज करू शकतात. सामान्य (General), ओबीसी (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना (EWS) अर्जाची फी म्हणून 100 रु. तर एससी (SC), एसटी (ST) उमेदवारांसाठी काहीही शुल्क नसेल.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2019

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जानेवारी 2020 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

हे पण वाचा -
1 of 353

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.