अरे देवा!!! IAS झाल्याच्या आनंदात कौतुक झालं; मात्र समोर आलेलं सत्य काहीतरी वेगळच होतं!!

करिअरनामा ऑनलाईन । जोपर्यंत तुम्ही डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवू नका, असं नेहमी सांगितलं जातं. ही बाब दिव्या पांडे हिला पूर्णपणे लागू होते. दिव्या झारखंडच्या रामगड जिल्ह्यात राहणारी 24 वर्षीय तरुणी आहे. तिने 2021 मध्ये UPSC ची परीक्षा दिली होती. हा तिचा पहिलाच प्रयत्न… निकालाचा दिवस उजाडला आणि निकाल हाती आला. निकाल समजल्यानंतर दिव्याचं पंचक्रोशीत कौतुक झालं. कारणही तसंच होतं. पहिल्याच प्रयत्नात दिव्या IAS झाली होती. दिव्या पांडे आणि तिच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की, पहिल्याच प्रयत्न दिव्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं आहे. मात्र जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा दिव्या आणि तिच्या कुटुंबीयांनी माफी मागितली आहे.

नक्की प्रकार काय आहे ?

दिव्या पांडे आणि तिच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की, मुलीने पहिल्याच प्रयत्नात UPSC च्या परीक्षेत यश मिळवलं. याशिवाय संपूर्ण भारतातून 323 वी रँक आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. यानंतर रामगडमध्ये ही बातमी पसरली. मीडियानेही तिचं खूप कौतुक केलं. अनेक ठिकाणांहून तिला गौरवण्यात देखील आलं.

मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला. एकसारखीच दोन नावं असल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. खरं म्हणजे झारखंडची दिव्या पांडे नाही तर दक्षिण भारतात राहणारी दिव्या पी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिलाच या परीक्षेत 323 वी रँक मिळाल्याचं सांगितलं जात आहे. सत्य समोर आल्यानंतर दिव्या पांडे आणि तिच्या कुटुंबीयांकडून माफी मागण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकला असता, मात्र अद्याप या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

दिव्याच्या बहिणीने केला खुलासा

दिव्या पांडेची मोठी बहीण प्रियदर्शनी पांडे म्हणाली की; “तिच्या बहिणीला उत्तर प्रदेशातील तिच्या मैत्रिणीने फोनवर कळवले की दिव्याने UPSC क्रॅक करून AIR 323 मिळवला आहे. आम्ही खूप आनंदात होतो. आम्ही UPSC वेबसाइटवर निकाल पाहण्याचा प्रयत्न केला पण इंटरनेट काम करत नव्हते. म्हणून दिव्याच्या मैत्रिणीच्या बोलण्यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला; ही आमच्याकडून अनवधानाने चूक झाली होती.”

हे पण वाचा -
1 of 4

खोटे दावे करण्याचा हेतू नव्हता” – दिव्याचे कुटुंबीय

या दाव्यांची प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली. दिव्या पांडेचा त्यांच्या कार्यालयात सत्कार करणाऱ्या रामगढच्या उपायुक्त माधवी मिश्रा यांनी ही ‘मानवी चूक’ असल्याचे म्हटले आहे. खोट्या बातम्या पसरवण्याचा किंवा खोटे दावे करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. ते म्हणाले की, सत्य समजल्यानंतर दिव्या दिल्लीला रवाना झाली आहे. दिव्या झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातील चित्तरपूर ब्लॉकमधील राजराप्पा कॉलनी येथील रहिवासी आहे.

…त्यामुळं म्हणतात ना ‘जोपर्यंत तुम्ही डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवू नका!!’

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com