दिल्लीत दहावी – बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

करिअरनामा ।दिल्लीत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने बुधवारी होणाऱ्या दहावी, बारावीच्या ईशान्य दिल्ली भागातल्या ८६ परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षार्थींना नवी तारीख कळवण्यात येणार आहे. दिल्लीच्या इतर भागातल्या परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसारच होणार आहेत.

या परीक्षा केल्या रद्द – 

दहावी – इंग्लिश कम्युनिकेटिव्ह

परीक्षा कोड – १०१

दहावी – इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर

परीक्षा कोड – १८४

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरू झाल्या आहेत. दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, दिल्लीच्या उत्तर पूर्व भागातल्या परीक्षा केंद्रांवर २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी-पालक, शिक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 केंद्रांवर कोणकोणत्या परीक्षा पुढे ढकलल्या त्याची माहिती घेण्यासाठी –http://cbse.nic.in/newsite/attach/postpone_delhi_ne_exam_2020.pdf

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”