आरटीई प्रवेशासाठी १५ सप्टेंबरची मुदत

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण हक्क कायद्यानुसर (RTE ) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहायक संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. १५ सप्टेंबर ही अखेरची मुदत असून त्यानंतर सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य दिले जाईल.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी न करण्याची सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रति घेऊन संबंधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित शाळेस ईमेल द्वारे कागदपत्रे पाठवून शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करून पालकांनी प्रवेश निश्चित करावा.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com