मुक्त विद्यापीठ प्रवेश अर्जासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन ।यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२०- २१ साठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश सुरु आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवली आली.त्यानुसार इच्छुक विध्यार्थ्यानी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे.

मुक्त विद्यापीठाच्या राज्यभरातील विभागीय केंद्रावर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कला,वाणिज्यसह अन्य विद्याशाखेच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. गेल्या २१ जुलैपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली होती. राज्यभरात कार्यरत असलेली अभ्यासकेंद्रे ,विद्यार्थ्यांची मागणी तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवली आली.यातून विद्यार्थ्यांना विनाविलंब शुल्कासह १५ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईट अर्ज करता येणार आहे. या संदर्भात विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ.प्रकाश देशमुख यांनी परिपत्रक जरी केले आहे.

विविध पदवी अभ्यासक्रमासोबत शिक्षणशास्त्र शाखेतील दोन वर्ष कालावधीच्या बी.एड.अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जात आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

 

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com