जेईई मेन 2022 सत्र 1 आणि सत्र 2 च्या तारखा बदलल्या, टर्म 2 परीक्षेनंतर आता इंजिनीअरिंग प्रवेश

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जेईई मेनच्या इंजिनीअरिंग प्रवेशाच्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. आता सत्र 1 परीक्षा, 20 जून ते 29 जून आणि सत्र 2 परीक्षा, 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान होणार आहे. सत्र 1 ची नोंदणी संपली आहे, तथापि, सत्र 2 साठी ऑनलाइन अर्ज लवकरच jeemain.nta वर उपलब्ध होतील अशी माहिती मिळाली आहे.

जेईई मेन 2022 चे हे तिसरे वेळापत्रक आहे. प्रथम 16 ते 20 एप्रिल दरम्यान हि परीक्षा होणार होती. मात्र, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी त्यांची प्रवेश परीक्षा सीबीएसई परीक्षांच्या दरम्यान सँडविच केली जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सदर परीक्षा तारखा बदलण्यात आल्या. त्यानंतर जेईई 21 एप्रिल ते 4 मे या कालावधीत होणार होती, मात्र तारखा पुन्हा राज्य बोर्डाच्या परीक्षांसोबत येत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे JEE च्या सत्र 1 आणि सत्र 2 मध्ये फक्त काही दिवसांचे अंतर राहिले.

विद्यार्थ्यांनी पुन्हा ऑनलाइन निषेधाचा अवलंब केला आणि ‘#JusticeforJEEAspirants’ आणि इतर अनेक टॅग्ज ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले. NTA – परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेने शेवटी जेईई मेनच्या दोन्ही परीक्षांच्या तारखा सुधारल्य.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com