विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! कोरोनामुळं JEE Main Exam 2020 परीक्षेसाठी अशी असेल नियमावली

Get real time updates directly on you device, subscribe now.

नवी दिल्ली । देशात कोरोना महामारीचे संकट आणि लॉकडाउनमूळ २ वेळा पुढे ढकलण्यात आलेली JEE Main Exam 2020 परीक्षा येत्या १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असून खबरदारी म्हणून या परीक्षेसाठी केंद्रानं मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक असून या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

१)परीक्षा केंद्रावर कोरोनामुळे अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची अधिक काळजी घेतली जाणार आहे. विशेषत सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. सॅनिटायझेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान १ तास लवकर हजर व्हावं लागणार आहे.

२)विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यासाठी वेळेचा स्लॉट देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवलं जाणार आहे.

३)परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे JEE Main Exam 2020 परीक्षेचे प्रवेश पत्र आणि ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असणार आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही वस्तू सोबत नेण्यास परवानगी नसणार आहे.

४)परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारच्या पिशव्यांना परवानगी दिली जाणार नाही.

५)परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी क्रमांक असलेल्या आसनावरच बसावं.

६)पेपर-२ साठी विद्यार्थ्यांना त्यांचे भूमिती बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेण्याची परवानगी असणार आहे. मात्र, वॉटर कलर वापरता येणार नाही.

७)विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान रफ वर्क काम करण्यासाठी एक कोरा कागद दिला जाणार आहे. त्याचबरोबर पेन, पेन्सिलही देण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी नावं लिहावं, परीक्षा झाल्यानंतर तो पेपर शिक्षकांना परत करावा.

८)विद्यार्थ्यांनी आपल्या हजेरीसोबतच आपला फोटो आणि स्वाक्षरी नीट आहे की, नाही याची खात्री करून घ्यावी. तसेच अंगठ्याचा ठसा देखील योग्य पद्धतीनं द्यावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: