कोरोना इफेक्ट : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 39 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाविषयी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजेश टोपे यांच्या उपस्थित सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे पण वाचा -
1 of 12

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 39 वर पोहोचला आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण अशा सर्वच भागातील शाळा बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच २५ मार्चपर्यंत शिक्षकही वर्क फ्रॉम होम करू शकतात.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: