हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

Gk Update । झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी सोरेन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

44 वर्षीय सोरेन यांचा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा हा दुसरा कार्यकाळ असेल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झामुमो, कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आघाडी करत 41 ही मैजिक फिगर गाठली. एकूण 81 सदस्यीय सभागृहात आता सत्ताधारी पक्षाकडे 47 सदस्य बल असेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे –
1) झारखंडची निर्मिती 15 नोव्हेंबर 2000 रोजी झाली.
2) बाबूलाल मरांडी हे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री आहेत.
3) रांची झारखंडची राजधानी आहे.

पक्षनिहाय निकाल
JMM – 30
BJP – 25
INC – 16
JVM – 03
RJD – 01
NCP – 01
CPI(M) -01
OTHER – 05

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-