वर्ग चार पदे तत्काळ भरण्यात यावीत – राज्य सचिव अरुण जोर्वेकर

करिअरनामा ।राज्य सरकारने वर्ग चार प्रवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य सरकारने राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे, या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले आहे, अशी माहिती संघटेनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर यांनी दिली.

सध्या प्रशासनात वर्ग तीन व वर्ग चारची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजाचा ताण वाढला आहे. कर्मचाऱ्यांना जास्त वेळ कामकाज करावे लागत आहे. रिक्त पदे तत्काळ भरती करण्याची आवश्यकता आहे.

राज्य सरकारने सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला आहे. या परिपत्रकानुसार कामकाज होणे अपेक्षित आहे. सुटीच्या दिवशी कामकाजाबाबत आदेश निघाल्यास त्यास संघटनेचा विरोध राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?  घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”