बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी CISF मध्ये ४२९ जागांची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असलेल्या पुरुष आणि महिला दोघांसाठीही सीआयएसएफ (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल होण्याची मोठी संधी आहे. भारत सरकारच्या ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’त हेड कॉन्स्टेबल साठी नुकतीच जाहिरात निघाली, त्याद्वारे एकूण ४२९ पदांसाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१९ आहे.

हेड कॉन्स्टेबल पदसंख्या : एकूण ४२९
पुरुष ३२८
महिला ३७
एलडीसीई ६४

शैक्षणिक पात्रता : उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

शारीरिक पात्रता :
खुल्या/ अनुसूचित जाती/ इतर मागासवर्गीय (SC/OPEN/OBC) प्रवर्गातील

पुरुष उमेदवार : उंची किमान १६५ सेंमी. आणि छाती
किमान ७७ सेंमी (फुगवून ५ सेंमी जास्त) असावी.

महिला उमेदवार : उंची किमान १५५ सेंमी. असावी.

अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील

हे पण वाचा -
1 of 46

पुरुष उमेदवार (ST) : किमान उंची १६२.५ सेंमी आणि छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ५ सेंमी जास्त) असावी.

महिला उमेदवार (ST) : किमान उंची १५० सेंमी असावी.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय २० फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

परीक्षा शुल्क : खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ फेब्रुवारी २०१९

जाहिरातीसाठी आणि अर्ज करण्यासाठी

संकेतस्थळ :
http://www.cisfrectt.in

Get real time updates directly on you device, subscribe now.