नोकरी शोधताय? पहा LinkedIn ने आणले हे खास फिचर्स

Get real time updates directly on you device, subscribe now.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –

नोकरी शोधत असलेल्या व्यक्तींसाठी LinkedIn ऑनलाइन प्रोफेशनल नेटवर्कने आपल्या युजरला अधिक सोयीचे होईल अशा प्रकारचे नवीन फिचर्स आणले आहेत. त्यामुळे तुम्ही जर लिंक्ड-इन वर नोकरी शोधत असाल तर ते तुम्हाला आणखीनच सोपे होणार आहे.

त्यामुळे नोकरी मिळवण्याची शक्यता वाढायला मदत होणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांचे लिंक्ड-इन वर प्रमाण वाढल्यामुळे LinkedIn ने हे नवे फीचर्स आणले आहेत.

LinkedIn Cover story

नोकरी शोधणारे व्यक्ती आता आपल्या प्रोफाईलवर कव्हर स्टोरी देखील अपलोड करू शकतील. पण ही कव्हर स्टोरी व्हॉट्सॲप सारखी नसेल. तितकीच प्रोफेशनल असेल आणि तिचं कामही वेगळे असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार चांगली कव्हर स्टोरी नोकरी देण्याऱ्यांच्या नजरेत येण्यासाठी मदत करेल. कव्हरस्टोरी द्वारे संबंधित व्यक्ती एका छोट्या व्हिडिओद्वारे आपल्या कौशल्य विषयांचा तसेच स्वतः विषयीचा आढावा देऊ शकेल.

Gender Pronoun
नोकरी शोधत असलेल्या 70 टक्के व्यक्तींना असं वाटतं तेव्हा हायरिंग मॅनेजर्सना त्यांचं जेंडर प्रोनाऊन माहिती हवं.72 टक्के हायरिंग मॅनेजर्स देखील याच गोष्टीशी सहमत आहेत. म्हणूनच LinkedIn वर युजर प्रोफाईल मध्ये एक वैकल्पिक फीड वाढवला आहे. तिथली माहिती युजरच्या प्रोफाईल मध्ये नावाच्या आधी दिसेल.

Creator Mode

क्रियेटर मोड युजर कडून ऑन केल्यानंतर त्याला फिचर अँड ऍक्टिव्हिटी सेक्शन्स आपोआप जोडला जाईल. तो युजरच्या प्रोफाईल मध्ये टॉप वर दिसेल त्यासोबतच ‘कनेक्ट बटन टू फोलो’ याचा देखील समावेश असेल. त्याद्वारे तुमच्याकडून केले गेलेले सगळे अपडेट्स लोकांना कळतील. तुम्ही पोस्ट करत असलेल्या विषयांचे हॅशटॅग्स ही देऊ शकतील. या मोड द्वारे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग ची सुविधाही आहे. तुम्ही लाइव्ह ब्रॉडकास्टिंग सुरू केल्यावर तुमच्या फॉलोवर्स ना रिंग जाईल आणि तुम्ही लाइव्ह असल्याची बाब त्यांना कळेल.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.