CBSE Term Exam 2 । बोर्डाकडून परीक्षांसंदर्भातील महत्वाची अधिसूचना जारी; जाणून घ्या

करिअरनामा ऑनलाईन  सीबीएसई बोर्डाकडून टर्म 2 (CBSE Term Exam 2) च्या परीक्षांपुर्वी एक महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. २६ एप्रिल रोजी नियोजित असलेल्या टर्म दोन च्या परीक्षांसंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून परीक्षा केंद्राकरता काही गाईडलाईन देण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे पालन करणे सर्वच शाळा प्रशासनाला बंधनकारक असणार आहे. इयत्ता 10वी आणि 12वीचे जवळपास 34 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

यंदा प्रथमच सीबीएसई बोर्ड दोन टर्ममध्ये (CBSE Term Exam 2) परीक्षा घेत आहे. टर्म 1 ची परीक्षा डिसेंबर 2021- ते जानेवारी 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती, तर टर्म 2 चे पेपर 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत घेण्यात येतील.

दरम्यान, बोर्ड लवकरच 10 आणि 12 या दोन्ही वर्गांसाठी प्रवेशपत्र जारी करेल अशी अपेक्षा आहे. जे उमेदवार परीक्षेला बसतील ते CBSE च्या अधिकृत साइट cbse.gov.in वरून प्रवेशपत्र तपासू शकतात आणि डाउनलोड करू शकतात.

CBSE Term Exam 2 : मार्गदर्शक तत्त्वांची यादी
हे पण वाचा -
1 of 14
  • आता कोरोनाचे वातावरण निवळले आहे. त्यामुळे सीबीएसईच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. टर्म २ च्या परीक्षकरता एका वर्गात १८ विद्यार्थ्यांना बसवण्यात येईल. टर्म १ च्या परीक्षेवेळी एका वर्गात १२ विद्यार्थ्यांची अट घालण्यात आली होती.
  • उमेदवारांना सामाजिक अंतर, मास्क, पाण्याची बाटलीत, स्वतःचे सॅनिटायझर घेऊन जाणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे यासारख्या COVID मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.
  • उमेदवारांना बोर्डाने जारी केलेल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे लागेल.
  • टर्म 2 प्रश्नपत्रिका कस्टोडियन यांना पाठवल्या जातील. (CBSE Term Exam 2)
  • परीक्षा केंद्रांचे संपूर्ण कामकाज केवळ केंद्र अधीक्षक हाताळतील.
  • इयत्ता 10वी आणि 12वीच्या दोन्ही परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 या दोन तासांसाठी होतील.
  • विद्यार्थ्यांनी नियुक्त परीक्षा केंद्रांवर सकाळी 9:30 पर्यंत अहवाल द्यावा आणि 10:00 पर्यंत परीक्षा हॉल मध्ये पोहोचावे लागेल.
  • परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.०० वाजता प्रवेश बंद केला जाईल आणि त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला आत प्रवेश दिला जाणार नाही.
  • विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजता प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वाटप करण्यात येणार आहे.
  • सर्व उमेदवारांना 20 मिनिटांचा अतिरिक्त वाचन वेळ मिळेल.
हे पण वाचा –

ICSE द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात ! नमुना पेपर करा download

CBSE बोर्डच्या द्वितीय सत्र परीक्षेचे प्रेवेशपत्र download करा