CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ९८.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

करिअरनामा ऑनलाईन | सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (CBSE)चा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी 91.46% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये 93.31% मुली तर 90.14% मुलांचा समावेश आहे. त्रिवेंद्रम, चेन्नई आणि बंगळुरू या 3 शहरातील विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे.महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे.

यंदा १८ लाख ८५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ७३ हजार १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थी पास झाले आहेत. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी निकाल जाहीर होईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज CBSE 10th Class Result 2020 ची घोषणा झाली असून cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर निकाल पाहता येणार आहे.
याशिवाय एसएमएस, डिजीलॉकर आणि उमंग अ‍ॅपच्या माध्यमातूनही विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत.

हे पण वाचा -
1 of 14

डिजिलॉकर ऐप: भारत सरकारने डिजिटल शैक्षणिक कागदपत्रांसाठी नवा डिजिटल ऐप आणला आहे. डिजिलॉकर ऐपवर 10 वीचा निकाल, मायग्रेशन सर्टिफिकेट आणि पास सर्टिफिकेट अपलोड केला जाईल. येथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकता. यासाठी आधी विद्यार्थ्यांना digilocker.gov.in वर जावून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ९८.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com