CBSE Result 2022 : ‘या’ तारखेला जाहीर होणार CBSE 12 वी चा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्ड लवकरच इयत्ता 10 वी आणि 12वीच्या निकालाच्या (CBSE Result 2022) तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित होतं. त्यानुसार आता CBSE चा दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार CBSE 12 वी बोर्ड परीक्षेच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण आता वेबसाइटवर ऑनलाइन अपलोड केले जात आहेत. यावेळी असा अंदाज वर्तवला जात आहे; की सीबीएसई 12 वी बोर्डाचा निकाल 15 जुलै 2022 पर्यंत जाहीर होऊ शकतो.

निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी CBSE बोर्डाच्या cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि parikshasangam.cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांच्या रोल नंबर आणि जन्मतारीखेच्या मदतीने निकाल तपासू शकतील.

CBSE 12वीच्या निकालात उत्तीर्ण होण्यासाठी (CBSE Result 2022) विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. मात्र विद्यार्थ्यांना 1 किंवा 2 विषयांमध्ये किमान गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्यास, विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षेत बसण्याची संधी दिली जाईल. परंतु विद्यार्थ्याला 2 पेक्षा जास्त विषयात 33 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्यास त्याला अनुत्तीर्ण घोषित केले जाईल.

असा चेक करा निकाल – (CBSE Result 2022)

  1. CBSE बोर्डाचा 12 वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट द्यावी लागेल.
  2. यानंतर मुख्यपृष्ठावर CBSE 12वी निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.
  3. आता एक नवीन पेज उघडेल, येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  4. CBSE 12 वी बोर्डाचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. निकाल डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

SMS द्वारे निकाल कसा बघाल –

  1. वेबसाइटशिवाय विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. (CBSE Result 2022)
  2. यासाठी त्यांना त्यांच्या फोनवरून CBSE 12 स्पेशल रोल नंबर टाइप करून 5676750 वर मेसेज पाठवावा लागेल.
  3. निकाल तुमच्या फोनवर SMS च्या स्वरूपात पाठवला जाईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com