CBSE बोर्डचा पेपर कशा पद्धतीने सोडवावा ? जाणून घ्या काही टीप्स !

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र 10वी आणि 12 बोर्ड परीक्षेला लवकरच सुरवात होणार आहे.विद्यार्थीही परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.26 एप्रिल पासून CBSE 10वी & 12वी बोर्ड परीक्षेला सुरुवात होणार आहे.विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड ही आले आहेत.

प्रथम सत्र परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली होती. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल मिळवून अंतिम निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाईटवरती जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या समोर एकच प्रश्न असतो की संपूर्ण पेपर दिलेल्या वेळेमध्ये कशा प्रकारे सोडवावा. बोर्ड परीक्षामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी रायटिंग practice करणं महत्वाचं आहे.जे शिक्षक तुमचे पेपर तपासतात त्याना चांगले अक्षर, पेपर अगदी सुटसुटीत लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क देतात.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 15 मिनिटे रिडींग टाईम दिला जातो यादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका पूर्णपणे वाचावी आणि कोणते प्रश्न सोडवायचे आहेत ते लक्षात ठेवावे आणि शेवटचे 15 मिनिटे उत्तरपत्रिका पडताळणी साठी ठेवावे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com