CBSE दहावी, बारावी परीक्षांच्या बनावट तारखांचा मेसेज व्हायरल; बोर्डाने केलं ‘ही’ सूचना देऊन सावध

नवी दिल्ली । CBSE दहावी, बारावी परीक्षांच्या बनावट तारखांचा मेसेज व्हायरल झाला आहे. त्यामुळं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) गुरुवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि पालकांना सावध करणारं हे परिपत्रक आहे. CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी आणप प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखांसंदर्भात एक बनावट नोटीस व्हायरल झाली आहे. ही माहिती अयोग्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये परीक्षांसंदर्भात नाहक घबराट पसरली आहे.

CBSE बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी गुरुवारी बोर्डाचे अधिकृत परिपत्रक काढून दहावी, बारावी परीक्षांसंदर्भत सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर, परीक्षांच्या तारखांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. ही व्हायरल माहिती चुकीची आहे, आणि त्यामुळे उगीचच विद्यार्थी-पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

बोर्डाने सर्व संलग्न शाळा, विद्यार्थी-पालक, अन्य संबंधितांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. CBSE बोर्डासंदर्भातील कोणत्याही अधिकृत माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन बोर्डाने केलं आहे. CBSEच्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ‘करोना महामारी काळात विद्यार्थी-पालकांच्या स्थितीबाबत सीबीएसई बोर्डाला जाणीव आहे. म्हणूनच कोणताही निर्णय बोर्डाने घेतला तर तो संबंधितांशी विचार विनिमय करूनच घेतला जाईल आणि त्याबाबत बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाईल.’

CBSEच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी क्लिक करा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’