CBSE Exam 2023 : परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; असा आहे CBSE बोर्डाचा नवा नियम

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन (CBSE Exam 2023) सत्रापासून बोर्डाच्या परीक्षांबाबत अनेक बदल केले आहेत. CBSE नं नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे. जे विद्यार्थी CBSE बोर्डाच्या परीक्षेत नापास होतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. CBSE बोर्डाने नक्की कोणते बदल केले आहेत ते जाणून घेऊया.
फक्त प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणार (CBSE Exam 2023)
आधी प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि थिअरी अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागत होत्या. मात्र आता हा निर्णय बदलण्यात आला आहे. प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थिअरी परीक्षा द्यावी लागणार नाही. प्रात्यक्षिक परीक्षा शालेय स्तरावरच घेतल्या जातील.

पुरवणी परीक्षेचा पर्याय
2023-24 या शैक्षणिक वर्षापासून, CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट परीक्षा यापुढे घेतल्या जाणार नाहीत. त्याऐवजी, बोर्ड पुरवणी परीक्षा घेईल. CBSE अधिसूचनेनुसार (CBSE Exam 2023) कंपार्टमेंट आणि सुधार परीक्षेचे नाव बदलून पुरवणी परीक्षा करण्यात आले आहे.
CBSE बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल लवकरच (CBSE Exam 2023)
यावर्षी सुमारे 38 लाख विद्यार्थी CBSE बोर्डाच्या 10वी, 12वीच्या परीक्षेत बसले होते. बोर्ड लवकरच निकाल जाहीर करू शकेल. तथापि, CBSE ने बोर्ड परीक्षा 2023 च्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केले जातील. याशिवाय विद्यार्थी डिजीलॉकरवरही निकाल पाहू शकतात. एसएमएस आणि उमंग अॅपवरही निकाल पाहता येईल.

असा चेक करा निकाल
1. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in वर जायचे आहे.
2. निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. तुमचा रोल नंबर टाकून सबमिट करा.
4. निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. (CBSE Exam 2023)
यावर्षी सीबीएसईने एकाच टर्ममध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या. 15 फेब्रुवारी 2023 पासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या. आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी 2023 पासून सुरू झाल्या. 2022 मध्ये, CBSE ने दोन टर्ममध्ये बोर्ड परीक्षा आयोजित केली होती.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com