CBSC Exam 2021| 10 वी, 12 वी परीक्षांच्या तारखा कधी होणार जाहीर? जाणून घ्या

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) पुढील वर्षी होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा मंगळवारी २२ डिसेंबर रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या परीक्षा पेपर-पेन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे बोर्डाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

CBSC Exam 2021 | 10th 12th Exam Datesheet

कोविड -१९ महामारी काळात देशभरात परीक्षा आयोजित करण्याच्या केंद्र सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, शिक्षणमंत्र्यांनी देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी त्रिस्तरीय संवाद साधण्याची योजना आखली आहे. मंत्री तीन दिवस वेबिनारच्या माध्यमातून या सर्वांशी संवाद साधतील.बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन ठेवण्याचा सीबीएसईचा कोणताही प्रस्ताव नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.सीबीएसई अधिकारी शिक्षक, विद्यार्थी-पालकांशी परीक्षांबाबत चर्चा करत आहेत, शिवाय देशभरातील शाळा-महाविद्यालये डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ मध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. आतापर्यंत सर्व वर्ग, तसेच बोर्ड परीक्षांची नोंदणी आदी काम व्हर्च्युअल मोडवर झाले होते.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी यापूर्वी म्हटले होते, ‘गेले नऊ महिने विद्यार्थी शाळा-महाविद्यांलयांमध्ये जाऊ शकलेले नाहीत. पण विद्यार्थ्यांनी हे संकटही आव्हान म्हणून स्वीकारले. सर्वात मोठं आव्हान या काळात आपली इच्छाशक्ती टिकवून ठेवणे हे होतं. आमच्यापुढील मोठं आव्हान बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेत लावून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची काळजी घेणे हे आहे.’येत्या काही दिवसांत आभासी संवाद साधल्यानंतर शिक्षणमंत्री विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांचा आढावा घेतील. आरोग्य व गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आरोग्य प्रोटोकॉल आदेशानुसार या परीक्षा आयोजित करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जाईल.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती

NDA NA Exam Update: या तारखेला होणार जाहीर