पुणे मेट्रोमध्ये ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना नोकरीची मोठी संधी; भरती प्रकिया सुरु

करिअरनाम ऑनलाईन । पुणे मेट्रोमध्ये वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. टेक्निशिअन, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर आदी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना मेट्रोच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. एकूण 139 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. महाराष्ट्र … Read more

पदवीधारकांना IB मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 2 हजार पदांची भरती, पगार 1,42,400 रुपये अधिक भत्ता

करिअरनाम ऑनलाईन । देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी घेतलेल्या युवकांसाठी नोकरीची एका मोठी संधी आहे. देशाच्या इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये मोठी पद भरती होणार आहे. गृह मंत्रालयाने (Home Ministry, MHA) यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहेत. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड-२ (ACIO) च्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. आयबीद्वारे यासाठी एसीआयओ परीक्षा (IB ACIO … Read more

बी.एस्सी पदवीधारक उमेदवारांना नौदलात नोकरीची सुवर्ण संधी; ‘या’ पदासाठी भरती सुरू

करीअरनामा ऑनलाईन – बी. एस्सी पदवीधारक उमेदवारांना नौदल गोदीत नोकरीची संधी आहे. वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाने जागा काढल्या आहेत. जाहिरातीनुसार, उमेदवारांना १६ जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करायचा आहे. १) पदाचे नाव- वैज्ञानिक सहाय्यक २) पात्रता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्री विज्ञान (ओशनोलॉजी) यापैकी कुठल्याही विषयात विज्ञान पदवी (बीएस्सी) घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू … Read more

साताऱ्यातील  शिक्षक बालाजी जाधव ठरले आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

करिअरनामा ऑनलाईन । टाळेबंदीच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील  शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जाधव यांनी टाळेबंदीच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल ‘हनी बी नेटवर्क’ व ‘गियान’ या संस्थांनी घेतली आहे. Balaji Jadhav बालाजी जाधव हे विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून … Read more

SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा करा ‘चेक’ निकाल

मुंबई । भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही ज्युनिअर असोसिएट्स भरतीसाठी झालेली मुख्य परीक्षा (SBI Clerk Mains examination 2020) दिली होती त्यांनी आपला निकाल sbi.co.in या संकेतस्थळावर पाहावा. या भरती प्रक्रियेद्वारे तब्बल ८ हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यापैती ७,८७० पदे नियमित … Read more

CA जानेवारी परीक्षेच्या उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी; असे बदलता येतील परीक्षा केंद्र

नवी दिल्ली । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ICAI CA जानेवारी २०२१ साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांची पसंती बदलण्याची परवानगी दिली आहे. ICAI CA Cycle 2 परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार २६ डिसेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर आपले परीक्षा केंद्रांचे पसंतीक्रम ऑनलाइन बदलू शकतात. (ICAI CA Cycle 2 January 2021 Exams) CA … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत होणार फायदा

मुंबई । सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या (SEBC) आरक्षणपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (EWS scholarship for Maratha students) मात्र, एसईबीसी … Read more

Magnetic Maharashtra 2.0: येत्या वर्षभरात राज्यात अडीच लाख नव्या नोकऱ्या! CM ठाकरेंनी दिला ‘हा’ शब्द

मुंबई । उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून महाराष्ट्राने मागील वर्षभरात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या काळात सहा महिन्यातच एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव … Read more

राज्यातील तरुण उद्यमींसाठी खुशखबर! स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी राज्य सरकारचे १० लाखांचे अर्थसहाय्य घोषित

करिअरनामा । राज्यातील तरुण उद्यमींसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी येत असलेल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार तरुणांना आर्थिक मदत करणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार तरुण उद्योजकांना स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी राज्य सरकारने १० लाखांचे आर्थिक सहाय्य करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख … Read more

10 वी, 12 वी CBSC बोर्डाच्या परिक्षा पुढे ढकलल्या; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा धोका जगभरातील अनेक देशात निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातही अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. अशातच CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबतही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. CBSC Exam Date 2021 जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची … Read more