सावधान ! आदिवासी विकास आयुक्तालयाच्या भरतीची जाहिरात बनावट

करिअरनामा ।आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाने बनावट संकेतस्थळावर मेगा नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.उच्चशिक्षित असलेल्या या संशयिताने “आदिवासी’चे बनावट संकेतस्थळ तयार करून तीन हजार 199 विविध पदांची मेगा नोकर भरती जाहीर केली होती.

सिव्हिल इंजिनिअर, इलेक्‍ट्रिक इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, शिपाई अशा पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात केले होते. अर्जासाठी खुल्या प्रवर्गाला 500 रुपये आणि इतरांसाठी 350 रुपये शुल्क आकारणी करीत हे शुल्क ऑनलाइन मागविले होते.

मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत भरती असून मुंबईसाठी एक हजार 31, नाशिक 724, पुणे 866, जळगाव 578 जागा भरणार असल्याची mahatribal.webs.com या बनावट संकेतस्थळावर माहिती दिली होती.परंतु आदिवासी विकास आयुक्तालयाची फेक वेबसाइट (mahatribal.webs.com) असल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता नाशिक सायबर ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा.

संशयित उच्चशिक्षित असून, संगणक प्रोग्रॉमिंगचेही त्याला ज्ञान आहे. चौकशीतून त्याच्या साथीदार आणि यापूर्वीही त्याने अशा पद्धतीने गुन्हा केल्याची माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. या बनावट जाहिरातीनुसार अर्ज करीत पैसे भरले असतील, अशा उमेदवारांनी सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”