Career Success Story : याला जिद्द ऐसे नाव!! द्रुष्टी गेली तरी कोडिंग शिकून मिळवली Microsoft मध्ये नोकरी; वाचा एक प्रेरणादायी कहाणी

करिअरनामा ऑनलाईन। असं म्हणतात अंगी जिद्द असली की काहीही मिळवण्याची ताकद आपल्यात येते. यासाठी (Career Success Story) वय, शिक्षण आणि शारीरिक सुदृढता मह्त्वाची नाही. ही गोष्ट सिद्ध करत इंदोरच्या एका विद्यार्थ्यांनं किमया केली आहे. कोणताही व्यावसायिक कामाचा अनुभव नसताना, यश सोनकिया या युवकाने मायक्रोसॉफ्ट या ड्रीम फर्ममध्ये नोकरी मिळवली आहे. तो आता लवकरच मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या टेक फर्ममध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणार आहे. विशेष म्हणजे यश हा दृष्टिहीन आहे. त्यामुळे भल्याभल्यांना लाजवेल असं काम त्याने करून दाखवलं आहे.

काचबिंदूमुळे गेली दृष्टी

यश हा मध्य प्रदेशातील इंदोरचा रहिवासी आहे. 2021 मध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर, हातात कोणतीही नोकरी नसताना, यशने स्वतःचे कौशल्य वाढवणे आणि YouTube वरून कोडिंग शिकणे सुरू केले. हे काम (Career Success Story) त्याच्यासाठी सर्वात कठीण होते कारण तो दृष्टिहीन आहे. जन्मजात काचबिंदूमुळे वयाच्या आठव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. अनुवांशिकदृष्ट्या निर्धारित विकृतींमुळे एक दुर्मिळ आजार त्याला जडला.

असा आहे शैक्षणिक प्रवास (Career Success Story)

यशच्या वडिल इंदोरमध्ये कॅन्टीन चालवतात. त्यांनी आपल्या मुलाला विशेष गरजा (Special needs) असलेल्या मुलांच्या शाळेत 5 वी पर्यंत शिक्षण दिले आणि नंतर त्याला नियमित शाळेत दाखल केले. गरिमा विद्या विहार, इंदूर येथून 2017 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी उत्तीर्ण केल्यानंतर यशने JEE मेन क्रॅक करून बीटेक इन कॉम्प्युटर सायन्समध्ये श्री गोविंदराम सेकसरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (SGSITS) मध्ये प्रवेश घेतला. त्याने 2021 मध्ये पदवी प्राप्त केली.

त्याने मिळवलेली पदवी नव्हे तर त्याने प्राप्त केलेल्या कोडिंगच्या कौशल्यामुळे (Career Success Story) त्याला मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळण्यास मदत झाली. मायक्रोसॉफ्टच्या निवड प्रक्रियेमध्ये कोडिंग आव्हाने आणि तीन मुलाखतींचा समावेश होता. या सर्व फेऱ्या त्याने पूर्ण केल्या.

यश सांगतो…

“कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यावर मी मुलाखतीची तयारी केली. मला फारच कमी कोडिंग माहित होते. हे ज्ञान मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळवण्यासाठी पुरेसे नव्हते. कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यानंतर मी घरीच कोडिंगचा (Career Success Story) अभ्यास केला आणि सराव केला. माझे कोडिंग मार्क अप टू द मार्क नव्हते आणि त्यामुळे मला माझी स्किल्स पॉलिश करायची होती. त्यामुळे मी YouTube च्या माध्यमातून आणि बड्या टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मित्रांच्या मदतीने कोडिंगचा अभ्यास केला.”

अशी झाली निवड

मायक्रोसॉफ्टमध्ये निवड झाल्या नंतर यशने त्याचे अनुभव सांगितले आहेत. ” मायक्रोसॉफ्टमध्ये निवड होण्यापूर्वी ४ फेऱ्या पार कराव्या लागतात. मी प्रथम ऑनलाइन परीक्षा दिली. त्यानंतर (Career Success Story) मुलाखतीच्या फेऱ्या आणि प्रत्येक फेरी प्राथमिक होती. कोडिंग मुलाखतीच्या तीन फेऱ्या होत्या, ज्यामध्ये सुधारित विचारसरणीचा समावेश होता. या पूर्व फेऱ्या पार करून माझे सिलेक्शन झाले आहे.”

दृष्टिहीन यशने अंधत्वावर मात करत मिळवलेले यश धडधाकट तरुणांना लाजवणारे आहे. त्याने शारीरिक अपंगत्वावर केलेली मात आणि त्याने मिळवलेले यश तमाम युवा वर्गाला प्रेरणा देणारे आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com