Career Success Story : बिकट परिस्थितीवर मात करत अवघ्या 21 व्या वर्षी बनला CA; वाचा ओमकार कातकाडेच्या जिद्दीची कहाणी

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच CA परीक्षा देशातील (Career Success Story) खडतर परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी सीएच्या परीक्षेला बसतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. पण नाशिकचा ओमकार कातकाडे याला अपवाद आहे. ओमकार वयाच्या 21 व्या वर्षीच सीए बनला आहे. ओमकारने घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ही अवघड परीक्षा पास केली आहे. वाचा ओमकारच्या जिद्दीची कहाणी…

प्रवास सोपा नव्हता

ओमकारने घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत CA परीक्षेत यश मिळवलं आहे. त्याचे वडील एका हार्डवेअर दुकानात काम करतात,आई घर सांभाळते, मोठा भाऊ एका खाजगी कंपनीत (Career Success Story) अल्पशा मानधनावर काम करतो. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण कसं करायचं हा प्रश्न ओमकारपुढे होता. त्यानं शिक्षण तर केलंच. पण अवघ्या 21 व्या वर्षी CA होण्याचा विक्रमही केला आहे.

‘तो काहीतरी भव्य करेल…’ (Career Success Story)

ओमकारचं प्राथमिक शिक्षण रविवार कारंजा येथील बालशिक्षण मंदिरात तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात झाले.पुढे उच्च माध्यमिक शिक्षण बिवायके महाविद्यालयातून पूर्ण केले. तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. त्यामुळे तो नक्की काहीतरी भव्य करेल अशी त्याच्या आई वडिलांसह नातेवाईकांना खात्री होती. त्याप्रमाणे ओमकारने अगदी कमी वयात ही कामगिरी करून दाखवली आहे.

वडिलांच्या कष्टाचं चीज झालं

ओमकारच्या शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी बरेच कष्ट घेतले आहेत. त्याच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी त्यांनी छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत ओमकारच्या गरजा पूर्ण केल्या. त्याचे शिक्षण अर्धवट सुटू नये (Career Success Story) याची त्यांनी काळजी घेतली. ओमकारने अभ्यास करताना प्रत्येक टप्प्यावर वडलांच्या कष्टाचं चीज केलं. ओमकारला दहावीत 91% तर बारावीत 87% टक्के मार्क्स होते. सीए-सीपीटी परीक्षेतही त्यानं 200 पैकी 185 मार्क्स मिळवत नाशिकमध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळवला होता.

18 तास केला अभ्यास

सीएची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याचा निश्चय ओमकारने केला होता. अभ्यासक्रमातील सर्वच विषय हे त्यानं आवडीचे करून घेतले होते. तो कधी 12 तास तर कधी 14 तास अभ्यास करत असे. कोरोना काळात लेक्चर ऑनलाईन होत असे त्यामुळे त्याचा क्लाससाठी जाण्या-येण्याचा वेळ शिल्लक राहत असे. या काळात तर सलग 18 तास अभ्यास केल्याचं ओमकारनं सांगितलं.

‘हे यश कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचे’

ओमकारनं जिद्दीच्या जोरावर हे यश खेचून आणलं आहे. तो सीए फायनलच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. त्यानं या यशाचं श्रेय आई सुनंदा, वडील शरद,आजोबा सुधाकर आव्हाड यांच्यासह एसव्ही टीटोरियलचे संचालक सीए विशाल पोतदार,सीए समीर तोतले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले आहे.

मार्गदर्शन हीच यशाची गुरूकिल्ली?

“माझ्या या सर्व प्रवासात आई वडील तर पाठीशी होतेच मात्र गुरुजनांचे चांगले मार्गदर्शन मिळाले,संस्कारक्षम मित्र मिळाले,त्यामुळे मी चांगला अभ्यास करू शकलो. अभ्यासात सातत्य ठेवता आले. माझी घरची परिस्थिती (Career Success Story) बिकट होती. वडील हार्डवेअर दुकानात काम करायचे आणि घर चालवायचे. या कठीण परस्थितीवर मात करण्याच मी ठरवलं होत. मी जर माझ्या नाजूक परिस्थितीचं गाऱ्हाणं सांगत बसलो असतो तर हे यश संपादन करू शकलो नसतो. त्यामुळे अभ्यासात सातत्य आणि गुरुजनांचे मार्गदर्शन हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे;” अशी प्रतिक्रिया ओमकारनं दिली आहे.

‘मुलानं शिकून मोठं व्हावं’

“आम्ही खूप गरिबीत दिवस काढले. त्यामुळे मुलाने आमच्यासारखं काबाड कष्ट न करता, शिकून मोठं व्हाव ही आमची इच्छा होती. त्याच्या शिक्षणासाठी मी मिळेल ती कामं केली. त्यानं देखील आमच्या कष्टाची जाणीव ठेवत चांगलं यश संपादन केले आहे. त्यामुळे खूप आनंद वाटतोय. तो खूप हुशार आहे, आणखी पुढे जाईल. त्याच्या पुढील प्रवासात देखील आम्ही त्याच्या पाठीशी आहोत;” अशी भावना ओमकारचे वडील शरद कातकाडे यांनी व्यक्त केली आहे.

‘यशाला शॉर्ट कट नसतो’

“आपलं यश हे परिस्थितीवर नाही तर आपल्या मेहनतीवर अवलंबून असतं. परिस्थिती कितीही बिकट असली तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवा. ते पूर्ण करण्याच्या निर्धारानं अभ्यास करा. मेहनती शिवाय पर्याय नाही. यशाला शॉर्ट कट नसतो, हे समजून पुढे वाटचाल करा, नक्की यशस्वी व्हाल;” असा सल्ला ओमकारनं संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com