Career Success Story : मन मै है विश्वास!! देशसेवेची जिद्द बाळगणारा तरुण आधी ‘इन्स्पेक्टर’ आणि नंतर बनला ‘फ्लाइंग ऑफिसर’

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अंकेश कुमार या तरुणाची कहाणी (Career Success Story) नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. अंकेश आधी पोलिस उपनिरीक्षक झाला आणि आता हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली आहे. अंकेशला दोन बहिणी तर दोन भाऊ आहेत. दोन्ही भावांमध्ये अंकेश मोठा आहे. आधी पीएसआय आणि आता फ्लाइंग ऑफिसरपदी निवड झाल्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाला पारावार उरला नाही. अंकेश कुमार याने संपूर्ण भारतात 78 वी रँक मिळवली आहे.

वडील बिहार पोलिस दलात अधिकारी
बिहार राज्यातील सीवानच्या गुठनी बाजार येथील रहिवासी असलेल्या बृजभान यांचा मुलगा अंकेश कुमार (Ankesh Kumar Flying Officer). वडील बिहार पोलिसात इन्स्पेक्टर पदावर होते, त्यामुळे त्याने लहानपणीच ठरवले होते की मोठेपणी त्यालाही पोलिस अधिकारी व्हायचे आहे.

पहिल्याच प्रयत्नात बनला इन्स्पेक्टर
ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि पहिल्याच प्रयत्नात बिहार पोलिस भरती परीक्षा उत्तीर्ण होऊन अंकेश उपनिरीक्षक झाला. बिहार पोलिसांची नोकरी, उपनिरीक्षक पद आणि सोबत पूर्ण कुटुंब…. त्याच्याकडे सर्व काही होते. पण, अचानक एके दिवशी त्याचा मूड बदलला. त्याने भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर व्हायचे ठरवले आणि त्या दिशेने तयारी सुरू केली. जेव्हा घरच्यांना कळाले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला, पण नंतर आपल्या मुलाच्या क्षमतेवर विश्वास ठेवून ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

असा आहे अंकेशचा शैक्षणिक प्रवास
ही गोष्ट आहे बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गुथनी बाजार भागात (Career Success Story) राहणाऱ्या अंकेश कुमार सिंगची. कथेत पुढे जाण्यापूर्वी, आणि भारतीय वायुसेनेच्या परीक्षेत त्याच्या निकालाचे काय झाले ते जाणून घेण्यापूर्वी अंकेशबद्दल थोडे अधिक जाणून घेऊया. गुथनी येथील मॉडर्न मिशन पब्लिक स्कूलमधून दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंकेशने त्याच परिसरातील आदर्श विकास विद्यालयात बारावीच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. बारावीचा निकाल उत्कृष्ट लागला आणि त्यानंतर त्याने जेईईची (JEE) तयारी सुरू केली.

आधी इंजिनिअरिंग.. नंतर पोलिस अधिकारी.. आणि आता..
2020 मध्ये बी. टेक. ची पदवी घेतल्यानंतर अंकेश अभियंता झाला. दरम्यानच्या काळात त्याला बिहार पोलीस खात्यात उपनिरीक्षकाची नोकरीही मिळाली. वास्तविक, अंकेशचे वडील ब्रिजभान सिंह हे गोपालगंजच्या हथुआ पोलिस ठाण्यात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. वडिलांच्या सेवेने प्रेरित होऊन अंकेशने इन्स्पेक्टर होण्याचा निर्णय घेतला. परीक्षा दिली तेव्हा पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला आणि सब इन्स्पेक्टर झाला. त्यानंतरच अंकेशने भारतीय हवाई दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीन वर्षे त्याने जोरदार तयारी केली.

अंकेशचा निकाल आश्चर्य करणारा होता (Career Success Story)
अंकेशला देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हायचे होते आणि त्यासाठी त्याने भारतीय हवाई दलाची निवड केली. याआधी त्याचा मार्ग पूर्णपणे वेगळा होता, पण अंकेशने सैन्यात जायचे आधीच ठरवले होते. जेव्हा त्याने भारतीय हवाई दलाची परीक्षा दिली तेव्हा अंकेशच नाही तर संपूर्ण कुटुंब आणि त्याचे मित्रही त्याच्या निकालाची वाट पाहत होते. आणि जेव्हा निकाल हाती आला तेव्हा कोणाचाही विश्वास बसत नव्हता. अंकेशने पहिल्याच प्रयत्नात भारतीय वायुसेनेच्या परीक्षेत 78 वा क्रमांक मिळविला.

माझ्या यशामध्ये आई-वडिलांचा मोठा वाटा
अंकेश कुमार सिंग आता भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर बनला होता. त्याने मिळवलेल्या यशाची संपूर्ण परिसरात चर्चा झाली. अंकेशने या कठीण परीक्षेत देशात 78 वा क्रमांक (Career Success Story) पटकावल्यामुळे त्याच्या कुटुंबाला त्याचा अभिमान वाटत आहे. अंकेशने आपल्या यशाविषयी बोलताना संगीतले; ” यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच कोणतेही यश मिळवता येते.” आपल्या यशाचे श्रेयही त्याने वडिलांच्या पाठिंब्याला आणि आईच्या आशीर्वादाला दिले आहे. अंकेशला दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com