Career Success Story : घर सोडून व्हॅनमध्ये राहते; जगभर भटकंती करून ॲलिस करते कोटीत कमाई; खास आहे तिची सक्सेस स्टोरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।हल्ली अनेक तरुण नोकरीच्या मागे न धावता (Career Success Story) व्यवसाय करण्याला प्राधान्य देताना दिसतात. आज आपण अशाच एका महिलेची गोष्ट वाचणार आहोत जिने 9 ते 5 नोकरी सोडून एक वेगळीच वाट धुंडाळली आहे. या महिलेने नोकरी तर सोडली पण तिने घरही सोडले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नोकरी आणि घर सोडून ही महिला नक्की काय करते? तिने नक्की कशामध्ये करिअर केलं आहे? तर याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल. ही महिला घर सोडून चक्क स्कूल बसमध्ये राहते आणि पगारापेक्षा दुप्पट पैसे कमावते. पहा कसं….

या महिलेचे नाव आहे ॲलिस एव्हरडीन (Alice Everdeen). हिचं वय ३२ वर्ष आहे. ती मुळची अमेरिकेतील रहिवासी आहे. ॲलिस अमेरिकेच्या ऑस्टिन येथील एका सप्लीमेंट कंपनीत (Career Success Story) नोकरी करत होती. या कंपनीत तिला उत्तम पगाराची नोकरी होती परंतु काही कालावधीनंतर तिला या नोकरीचा कंटाळा आला. 9 ते 5 नोकरीतील रस निघून गेल्याने तिने ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु यानंतर तिने रोजगारासाठी काय केले हे जाणून घेणे औत्युसक्याचे ठरणार आहे.

स्कूल व्हॅनमध्ये थाटले घर; व्हॅनमधून फिरतात जगभर
ॲलिसने नोकरी सोडली. यानंतर तीने चक्क एक स्कूल व्हॅन विकत घेतली आणि ती तिच्या पती आणि पाळीव कुत्र्यासह त्या व्हॅनमध्येच राहू लागली. त्या व्हॅनलाच तिने आपले घर बनवले आहे. व्हॅनमध्ये राहताना केवळ खाण्याचा आणि पार्किंगचा खर्च होत असल्याने घरापेक्षा व्हॅन अधिक स्वस्त आणि परवडणारी आहे असेही ॲलिसने सांगितले आहे. पार्किंगसाठी दर महिना 3 ते 6 हजार; त्यातही जर सार्वजनिक जागी पार्किंग केली तर अजिबातच पैसे भरावे लागत नाहीत. पेट्रोलसाठी एकूण ८०,००० तर जेवणासाठी २० ते ४० हजार रुपये खर्च होतो; असेही ॲलिसने सांगितले. या व्हॅनमधून ते तिघे सध्या संपूर्ण देशभरात फिरत आहेत.

ॲलिस पैसे कसे कमावते? (Career Success Story)
ॲलिस नोकरी आणि घर सोडून व्हॅनमध्ये राहू लागली; पण आता ती उदरनिर्वाहासाठी नक्की काय करते? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या व्हॅनमधून देशभरात फिरत असताना ॲलिस फ्रीलान्सिंग करून दरमहा जवळपास 1 कोटी रुपये कमवत आहे. कंटेन्ट मॅनेजर पदावर फ्रीलान्सिंग करत ॲलिस तिचा आणि तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. यामध्ये तिला तिच्या पतीचीही उत्तम साथ लाभत आहे. विशेष म्हणजे ॲलिसला पूर्वी तिच्या नोकरीतून जेवढे पैसे मिळत होते त्यापेक्षा दुप्पट पैसे ती आज या फ्रीलान्सिंगद्वारे कमवत आहे. कंटेन्ट मॅनेजर बरोबरंच ॲलिस व्हॉईस ओव्हर, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ तयार करणं ही देखील कामं करते. त्यातूनही तिला चांगला पैसा मिळत आहे. ‘Fiverr’ सारख्या नामांकित कंपन्यांसाठी सध्या ती फ्रीलांसिंगचे काम करत आहे. (Career Success Story)
9 ते 5 ची नोकरी सोडून ॲलिस ज्या दिशेने निघाली आहे त्या दिशेने नक्कीच ॲलिस आणि तिच्या पतीला यशाचा मार्ग दाखवला आहे हे निश्चित. पण या सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तिची निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेला निर्णय योग्य ठरवण्यासाठी केलेली मेहनत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com