Career Success Story : अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतला; उभारली 150 कोटींची कंपनी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेच्या कंपनीतील किफायतशीर (Career Success Story) नोकरी सोडणे हा खरंतर अनेक भारतीयांसाठी कठीण निर्णय ठरू शकतो. कारण परदेशात मिळणाऱ्या पोझिशन्सद्वारे ऑफर केलेला पगार, आर्थिक सुरक्षा, आराम, या गोष्टी भारतातील नोकऱ्यांशी सहसा जुळून येत नाही. त्यामुळे अनेक जण परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. काहीजण याला अपवाद ठरतात. यापैकीच एक आहेत ‘करिअर मोझॅक’ कंपनीचे संस्थापक अभिजित झवेरी. ज्यांनी परदेशातील नोकरी सोडून भारतात परत येवून व्यवसाय उभा करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या कर्तबगारीने हा कठीण निर्णय योग्य सिध्द केला आहे.

मायदेशी परत येण्याचा निर्णय घेतला
तसं पहायला गेलं तर काहीजण त्यांच्या देशासाठी योगदान देण्याच्या इच्छेने प्रेरित असतात. ‘करिअर मोझॅक’ (Career Mosaic) या संस्थेचे संस्थापक अभिजीत झवेरी यांची (Career Success Story) गोष्टसुद्धा अशीच आहे. अभिजीत झवेरी यांना युनायटेड स्टेट्समधील इंटिग्रेटेड सिस्टम्स मॅनेजमेंटमध्ये उच्च पगाराची नोकरी मिळाली होती. काही वर्षे परदेशात उच्च पगाराची नोकरी केल्यानंतर त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा आणि आपल्या मायदेशी परतून काहीतरी चांगलं करण्याचा निर्णय घेतला. तर अभिजीत झवेरी यांच्या प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

2002 मध्ये केली कंपनीची स्थापना (Career Success Story)
2002 मध्ये अभिजीत झवेरी यांनी ‘करिअर मोझॅक’ कंपनीची स्थापना केली, जी गुजरातमध्ये उभी आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खरा आणि पारदर्शक सल्ला देण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. पण, जेव्हा अभिजीत झवेरी यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली, तेव्हा अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. विशेषत: भारतातील व्हिसा, नंतर कोविड-१९ महामारीचा काळ आदी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी होती. पण त्यांनी हार मानली नाही आणि या आव्हानांचा मोठ्या हिंमतीने सामना केला.

‘करिअर मोझॅक’ कोणती सेवा देते
आज अभिजीत झवेरी यांची करिअर मोझॅक कंपनी दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील त्यांच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या बाजारपेठेतील प्रवेश, विस्तार आणि विविधता (Career Success Story) पहात असलेल्या आघाडीच्या विद्यापीठांबरोबर काम करत आहे. तसेच कंपनीने २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षात १५० कोटी रुपयांची उल्लेखनीय उलाढाल केली आहे. तर असा आहे अभिजीत झवेरी यांचा प्रेरणादायी प्रवास. त्यांनी मोठी हिंमत दाखवून अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आपला व्यवसाय उभा केला आणि त्यामध्ये यश मिळवून दाखवलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com