Career Oriented Courses : मोठ्या पॅकेजची नोकरी हवीय; ‘हा’ कोर्स तुम्हाला मिळवून देईल लाखोंचे पॅकेज; कुठे घ्याल ऍडमिशन?

करिअरनामा ऑनलाईन। आज प्रत्येकजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. शिक्षण (Career Oriented Courses) झाल्यानंतर युवा पिढीची नोकरी मिळवण्यासाठी वणवण सुरु होते. बऱ्याचदा औपचारिक आणि पारंपरिक शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळत नाही आणि मिळालीच तर चांगल्या पगाराची मिळतेच असं नाही. अशावेळी आपल्याला इतर प्रोफेशन कोर्सेसकडे वळावे लागते. त्यामध्ये विदेशी भाषेचे म्हणजेच Foreign Language Courses करणे फायद्याचे ठरतात.

उच्च शिक्षण घेऊनही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसेल, तर तुम्ही विदेशी भाषा शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता. यासाठी तुम्हाला (Career Oriented Courses) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागामध्ये 12 वीनंतर प्रवेश मिळू शकतो. येथे तुम्हाला चायनीज, फ्रेंच, जर्मन या भाषा शिकता येऊ शकतात. तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला IT कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकून त्यामध्ये आपलं करिअर करण्याची इच्छा असते. मात्र, या भाषा शिकायला कुठे मिळतात आणि यासाठी किती खर्च येतो, हे काहीच माहीत नसते. यामुळे अनेकदा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मात्र, विदेशी भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Career Oriented Courses) मराठवाडा विद्यापीठात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकण्याची संधी मिळावी, यासाठी विदेशी भाषा विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक विदेशी भाषा शिकवल्या जात आहेत. येथे विद्यार्थ्यांना फ्रेंच जर्मन आणि चायनीज या तीन भाषा शिकवल्या जातात.

विदेशी भाषेचे प्रमुख विकास कुमार सांगतात की, “मराठवाड्यात पारंपारिक शिक्षणाची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा नोकऱ्यांच्या संधी मिळत नाही. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतात, त्यांना चांगला पगार मिळत नाही. यामुळे अनेक विद्यार्थी इच्छा नसतानाही कमी पगारामध्ये नोकरी करतात. मात्र, विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकल्यानंतर चांगल्या नोकरीच्या संधी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन चांगली नोकरी मिळवावी.”

असे आहेत कोर्स – (Career Oriented Courses)

या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही फ्रेंच, जर्मन, चायनीज या भाषा शिकू शकता. यासाठी पुढील कोर्स तयार करण्यात आले आहेत.

  1. सर्टिफिकेट अप्रोपॅसिंग इन चायनीज
  2. फ्रेंच ॲन्ड जर्मन
  3. डिप्लोमा
  4. पीजी डिप्लोमा इन चायनीज ॲन्ड जर्मन

असे कोर्स करून तुम्ही विदेशी भाषा शिकू शकता. या कोर्सेसचा कालावधी विचार केल्यास COP आणि डिप्लोमाचं 1 सेमीस्टर आणि पीजी डिप्लोमा 2 सेमीस्टरचा आहे.

प्रवेश प्रक्रिया – bamu.ac.in या वेबसाईटवरून तुम्ही प्रवेश घेण्यासंदर्भात अधिक माहिती घेऊ शकता.

संपर्क – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पस, विदेशी भाषा विभाग, औरंगाबाद
Ph. +91-0240-2403399, 2400431

EMail – [email protected]

किती आहे कोर्स फी –

या कोर्सेसची फी 5,000 ते 10,000 इतकी असल्याची माहिती आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे –

  • 12 वी मार्कशीट
  • जात प्रमाणपत्र (Career Oriented Courses)
  • फोटो

वयो मर्यादा – 40 वर्षे

करिअरच्या संधी –

हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर अमेझॉन, एचसीएल, वर्लोप , इन्फोसिस, टीसीएस इत्यादी कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. नोकरी मिळाल्यानंतर साधारण 5 लाखांचे पॅकेज मिळू शकतं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com