Career News : ‘या’ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकांसाठी जॉब ओपनिंग्स; इथे करा Appply

करिअरनामा ऑनलाईन। वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली (Walchand College of Engineering Sangli) येथे (Career News) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 असणार आहे.

संस्था – वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली

भरली जाणारी पदे –

  1. प्राध्यापक (Professor)
  2. सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor)
  3. सहयोगी प्राध्यापक (Assistant Professor)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे – (Career News)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.walchandsangli.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com