Career News : IT मध्ये करिअर करायचंय?? ‘ही’ नामांकित कंपनी भारतात देणार 10 हजार नोकऱ्या

करिअरनामा ऑनलाईन। प्रत्येक जण आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IT क्षेत्राकडे वळू लागला आहे. त्यात (Career News) मोठमोठ्या IT कंपन्या भारतात तरुणांच्या शोधात येत आहेत आणि नोकऱ्या देत आहेत. अशीच एक नामांकित कंपनी ‘Salesforce’ नं भारतात लवकरच तब्बल 10,000 जागांसाठी भरती करण्याची घोषणा केली आहे.

सेल्सफोर्स इंडियाने घोषणा केली आहे की ही फर्म 2023 च्या सुरूवातीपासून त्यांची कर्मचाऱ्यांची संख्या 10,000 पर्यंत वाढवणार आहे. सध्या, फर्ममध्ये 7,500 कर्मचारी आहेत आणि जानेवारी 2023 पर्यंत ही संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे;असं सेल्सफोर्सच्या सीईओ आणि चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य, यांनी सांगितलं आहे.

भट्टाचार्य पुढे म्हणाल्या; की सेल्सफोर्स इंडिया मुख्यत्वे बँकिंग सेवा, वित्तीय सेवा, उत्पादन सेवा आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. कंपनीने मुंबई, हैदराबाद, जयपूर, गुरुग्राम, बेंगळुरू आणि पुणे या (Career News) शहरांमध्ये कार्यालये उघडली आहेत. सेल्सफोर्सने कोरोना महामारीच्या काळात भारतात 2500 वरून 7500 पर्यंत त्यांचे कर्मचारी वाढवले ​​आहेत.

भट्टाचार्य पुढे म्हणाल्या की, फर्म ऑफिसमधून काम करण्यावर भर देत आहे कारण फर्मचा विश्वास आहे की ऑफिसमधून काम केल्याने सहयोग आणि आपुलकीची भावना वाढते.भारतात कार्यालयातून काम करण्यावर कंपनीचा भर राहील परंतु कर्मचार्‍यांसाठी Work from Home देखील सुरू राहील; अशी माहिती अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली आहे.

भट्टाचार्य यांनी हे देखील अधोरेखित केले की विश्लेषण आणि एकत्रीकरण यासारख्या कौशल्यांना खूप मागणी आहे. त्यांच्या मते सायबर सुरक्षा हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे जेथे (Career News) कौशल्यांना खूप मागणी आहे कारण ही अशी गोष्ट आहे ज्याची कोणीही काळजी घेत नाही आणि या क्षेत्रात विकसित केल्याने फर्मची वाढ होऊ शकते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com