Career in Jewellery Designing : महिलांनो… करिअर करायचंय!!! ज्वेलरी डिझायनिंग तुम्हाला ग्लॅमर मिळवून देईल

करिअरनामा ऑनलाईन । महिला म्हणलं कि दागिने आणि दागिने म्हणलं कि महिला हे समीकरण आलंच. (Career in Jewellery Designing) दागिन्यांची आवड नसेल अशी एकही महिला शोधून सापडणार नाही. सणवार असो किंवा लग्नसमारंभ असो दागिने घालण्यासाठी महिलांच्या उत्साहाला सीमा नसते. हे दागिने आणि त्यांच्यावरील निरनिराळ्या मनमोहक डिझाइन्स येतात तरी कुठून? दागिन्यांना डिझाईन कोण देतं? नक्षीकाम कसं केलं जातं? असे प्रश्न तुम्हाला कधी पडले आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हेच काम तुम्हीही करू शकता. आज आम्ही तुम्हाला ज्वेलरी डिझाईनिंगमधील करिअरच्या नव्या संधीबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

काय आहे ज्वेलरी डिझाईन?

  • ज्वेलरी डिझाइन ही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवण्याची कला आहे.
  • सोने, चांदी, मोती, प्लॅटिनम इत्यादी धातूंचे कोरीव काम करून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात.
  • धातूच्या दागिन्यांबरोबर हस्तिदंत, दगड, ऑयस्टर या वस्तूंचा वापर स्टाइलिश दागिने तयार करण्यासाठी केला जातो.
  • ज्वेलरी डिझाइनर दागिन्यांची शैली, नमुना या गोष्टी सेट करतात.

कोण करू शकतं कोर्स – (Career in Jewellery Designing)

  • दहावी पास झालेल्यांसाठी ज्वेलरी डिझाईन हा एक उत्तम करिअर पर्याय आहे.
  • तुम्ही बारावी आणि ग्रॅज्युएशननंतरही हा कोर्स करू शकता.
  • दहावीनंतर तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकता.
  • इच्छुकांना पुढील कोर्ससाठी परीक्षा द्यावी लागते.
  • यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्ही कोर्ससाठी अर्ज भरू शकता.

जाणून घ्या टॉप कोर्सेस –

बेसिक ज्वेलरी डिझाईन

डायमंड आइडेंटीफिकेशन आणि ग्रेडिंग

ज्वेलरी डिझाईनमध्ये बीएससी

बॅचलर ऑफ ज्वेलरी डिझाईन

अ‍ॅक्सेसरीज डिझाईन बॅचलर

ज्वेलरी डिझाईन आणि जेमोलॉजी मध्ये डिप्लोमा

कॅडसह अ‍ॅडव्हान्स ज्वेलरी डिझाईन

कोणते कॉलेज निवडाल –

जेमोलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई.

सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई.

जेम्सस्टोन आर्टिझन्स ट्रेनिंग स्कूल, जयपूर.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेमोलॉजी, नवी दिल्ली.

रत्न व दागिन्यांची निर्यात जाहिरात परिषद, जयपूर.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली.

पहा करिअरच्या संधी –

शिक्षणानंतर तुम्ही कोणत्याही दागिने तयार करणाऱ्या कंपनीमध्ये जॉब करू शकता. तसंच तुम्ही ज्वेलरी डिझाईन करण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

इतका मिळेल पगार –

या क्षेत्रात फ्रेशर म्हणून करिअरची (Career in Jewellery Designing) सुरुवात केल्यास दरमहा 10 ते 30 हजार रुपये वेतन मिळू शकते. जर कोणी या क्षेत्रात निर्यात आणि आयात करण्याचा व्यवसाय करत असेल तर त्यांची कमाई लाखो रुपयांमध्ये असू शकते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com