यशोगाथा एका शेतमजुराच्या मुलाची; मुलगा कलेक्टर झाला त्यावेळी आई दुसऱ्याच्या शेतात खुरपत होती

करिअरनामा ऑनलाईन | काही व्यक्तींना आपल्या आयुष्यात अपार कष्ट करावे लागते. पण, त्यांना त्या कष्टाचे दुःख नसते. कारण त्यांना वाटत असते की, या कष्टाचे पांग आपला मुलगा किंवा मुलगी भविष्यात फेडेल याच आशेवर ते कष्टाचे डोंगर पार करत असतात. या कष्टाची जाण त्यांच्या मुलांना असेल तर, मुलं ही कष्ट करून ते पांग फेडतात. अशीच एक कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये शेतमजूर आई-वडिलांचा मुलगा कलेक्टर झाला त्यावेळी, त्याची आई दुसऱ्याच्या शेतामध्ये खूप होती.

गरिबीतून शिक्षण घेऊन पुढे जाणे किती अवघड असते हे त्या भावना जगल्या शिवाय बहुतांशी समजत नाही. सोलापूर जिल्ह्यातील श्रीकांत खांडेकर विद्यार्थी यूपीएससीच्या लोकसेवा आयोगामध्ये, नागरी सेवा परीक्षा 2019 मधून 231 क्रमांकाने मिळवून IAS म्हणून निवडले गेले आहेत. श्रीकांतच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी अपार कष्ट करत शिक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षणासाठी ते पुरेसे नव्हते म्हणून त्यांना आपली तीन एकर जमीन नाही विकावी लागली.

सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शिक्षण घेतल्यानंतर दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर दिल्ली येथे यूपीएससीची एक वर्ष तयार केली. त्यानंतर झालेल्या वनसेवा परीक्षा मध्ये देशात 33 वे आले व महाराष्ट्रात ते प्रथम क्रमांकाने पास झाले होते. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये 2019 मध्ये यूपीएससी मार्फत त्यांचे सिलेक्शन झाले. व आपल्या गावातील सगळ्यात पहिले कलेक्टर ठरले.

 

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp 

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com