महापोर्टल भरती प्रक्रिया रद्द करा- खा. श्रीकांत शिंदे यांची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । राज्यात महापोर्टल पद्धतीने भरती प्रक्रिया केली जाते. मात्र, ही प्रक्रिया किचकट असल्याने डॉक्टर व अधिकाऱ्यांची भरती केली जात नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेसह राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापोर्टल भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

मेगापोर्टल भरती प्रक्रिया रद्द करून राज्यातील विविध पालिका व महापालिकांना भरती प्रक्रियेसाठी दिलासा द्यावा. मेगापोर्टलऐवजी आॅफलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविल्यास डॉक्टरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. मेगापोर्टल भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.

दरम्यान केडीएमसीतील रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांत विविध ९० पदे मंजूर करण्यात आली आहेत. २००८ पासून पाठपुरावा सुरू केले असताना २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने या पदांना मंजुरी दिली. तेव्हापासून या रुग्णालयांत डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नाही. डॉक्टरांची भरती होत नसल्याने या रुग्णालयात रुग्णांना पुरेशा आरोग्यसेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. असं ही शिंदे यांनी सांगितलं.

_—-__

हे पण वाचा -
1 of 330

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.