CA Toppers 2021। मुंबईची कोमल जैन सीए परीक्षेत देशात पहिली

करिअरनामा ऑनलाईन । सीए फायनल परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदा घाटकोपरची कोमल जैन ही विद्यार्थिनी देशात पहिली आली आहे. माटुंगा येथील पोदार कॉलेजमधील या विद्यार्थिनीने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. CA Toppers 2021

इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय)ने मंगळवारी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत कोमलने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिला ८०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत. तर या परीक्षेत सुरत येथील मुदित अग्रवाल आणि मुंबईची राजवी नाथवानी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिचे वडील निवृत्त अकाउंटन्ट आहेत तर आई कॉमर्स शाखेची पदवीधर असून गृहिणी आहे. “मला लहानपणापासूनच कॉमर्समध्येच करिअर करायची इच्छा होती. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कन्सल्टन्सी किंवा फायनान्स या दोन पैकी कोणत्या क्षेत्रात जायचे याबाबत अद्याप मी निर्णय घेतला नसल्याचे तिने सांगितले.”

यंदाच्या परीक्षेत दोन्ही ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४.५ टक्के म्हणजे १९ हजार २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर फक्त ग्रुप १चा निकाल १२.८ टक्के तर ग्रुप २चा निकाल ३१ टक्के इतका लागला आहे. यंदा ३२ हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप १ तर २८ हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप २ ची परीक्षा दिली. जुन्या पद्धतीने घेतलेल्या झालेल्या परीक्षेत जयपूरचा मयांक सिंग प्रथम आला आहे. या परीक्षेला चार हजार १०० विद्यार्थी बसले होते यापैकी ५.८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CA Toppers 2021

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा https://www.careernama.com