CA Admit Card 2021।असे करा डाउनलोड

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ICAI CA January 2021 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत त्यांनी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटवरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. आयसीएआयची icaiexam.icai.org ही वेबसाईट बघावी.

सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट किंवा फायनल प्रोग्रामसाठी जानेवारी सत्रातील परीक्षा होत आहे. उमेदवारांनी वेबसाईटवर लॉग इन करून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्यावे. आयसीएआयने अॅडमिट कार्डसोबत अंडरटेकिंगही घेत आहे. अल्पवयीन उमेदवारांना हे सांगायचे आहे की ते जानेवारी २०२१ ची परीक्षा त्यांच्या पालकांच्या परवानगीने देत आहेत. या अर्जांवर पालकांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. यावर उमेदवार परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकासमोर सही करतील. ही परीक्षा २१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होत आहे.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा – CA Admit Card 2021

आयसीएआयचं अधिकृत वेबसाईट  icaiexam.icai.org वर जा.

लॉगइन / रजिस्टर पर्यायावर क्लिक करा.

विचारलेली माहिती भरा.

आता तुमचे अॅडमिट कार्ड तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. ते काळजीपूर्वक वाचा.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट काढून ठेवा.

अधिकृत वेबसाईट – http://icaiexam.icai.org

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com