Business Success Story : दिल्लीच्या पूनमने UK मध्ये एका लाखात सुरु केला व्यवसाय; आज होते 800 कोटींची उलाढाल; पतीही देतात खंबीर साथ

करिअरनामा ऑनलाईन । दिल्लीत राहणारी पूनम गुप्ता लग्नानंतर UKला गेली. नवराही (Business Success Story) तिथेच स्थायिक होता.  UKला गेल्यानंतर पूनम नोकरीच्या शोधात होती. पण अडचण अशी होती की पूनमला UKमध्ये काम करण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे तिला तिथे नोकरी मिळत नव्हती. नोकरी मिळत नसल्याने पुनमने व्यवसाय सुरु करण्याचा  विचार केला. यानंतर तीने नेमकं काय करायचं यावर संशोधन सुरू केलं. या दरम्यान तिला पेपर रिसायकलिंगची कल्पना सुचली. पूनमकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतेही भांडवल नव्हते. तिला स्कॉटिश सरकारच्या एका योजनेतून एक लाख रुपयांचा निधी मिळाला आणि आज तिने 800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कंपनीची स्थापना केली आहे. पाहूया ‘पेपर क्वीन’ म्हणून ओळख असलेल्या पुनमने या व्यवसायात कसं यश मिळवलं याबद्दल…

Business Success Story Poonam Gupta
दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिकली

पूनम गुप्ता ही मूळची दिल्लीची आहे. आता ती आपल्या कुटुंबासह स्कॉटलंडमध्ये राहते. पूनम गुप्ताने सांगितले की तिने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून अर्थशास्त्रात ऑनर्स केले आहे. यानंतर तीने MBA केले. 2002 मध्ये पुनीत गुप्तासोबत तिचे लग्न झाले होते. यानंतर पूनमही (Business Success Story) पतीसोबत स्कॉटलंडला गेली. दुहेरी पदवीमुळे तिथे नोकरी मिळेल, अशी आशा तिला होती. यावर पूनम गुप्ता म्हणाली की, तिने खूप प्रयत्न केले पण काहीच काम मिळाले नाही. कंपनी म्हणायची की तुम्हाला UK मध्ये काम करण्याचा अनुभव नाही; त्यामुळे आम्ही तुम्हाला नोकरी देवू शकत नाही.

Business Success Story Poonam Gupta
रद्दी कागदाचा पुनर्वापर सुरू केला

नोकरी न मिळाल्याने पूनम गुप्ताने स्वतःचे काम करण्याचा विचार केला. एक दिवस पुनमच्या मनात असे आले की, इकडे-तिकडे नोकऱ्या शोधण्यापेक्षा स्वत: लोकांना नोकऱ्या देणे चांगले. मग काय करायचं हा प्रश्न समोर होता. तीने  कामाबद्दल संशोधन केले. अनेक महिन्यांच्या (Business Success Story) संशोधनानंतर रद्दी कागदाचा पुनर्वापर करण्याची कल्पना तिला सुचली. यानंतर कागद आणि धातूच्या पुनर्वापराचे काम सुरू झाले. सुमारे 19 वर्षापूर्वी या व्यवसायाची सुरुवात झाली आहे.

Business Success Story Poonam Gupta
PG पेपर कंपनीचा कागद 60 देशांमध्ये होतो निर्यात (Business Success Story)

पूनम गुप्ताच्या कंपनीचे नाव पीजी पेपर कंपनी लिमिटेड असे आहे. सुरुवातीला पूनम गुप्ताची कंपनी युरोप आणि अमेरिकेतील कंपन्यांकडून स्क्रॅप पेपर खरेदी करत होती. आता जगातील अनेक देशांमधून भंगार घेतले जाते. तसेच, ते चांगल्या दर्जाचे कागद तयार करून इतर देशांमध्ये पाठवतात.

Business Success Story Poonam Gupta
800 कोटींपेक्षा जास्त होते उलाढाल

पूनम गुप्ता यांची कंपनी आता अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी सांगितले की आमच्या कंपनीची उलाढाल 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांची कंपनी (Business Success Story) हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि मेडिकलसह आयटी क्षेत्रातही काम करते. कंपनीचे मुख्यालय स्कॉटलंडमध्ये आहे. सध्या त्यांच्या कंपनीत सुमारे 350 लोक काम करतात.

 

 

 

Business Success Story Poonam Gupta

पतीनेही नोकरी सोडून पत्नीला दिली साथ

पूनम गुप्ता यांचे पती पुनीत गुप्ता हे देखील नोकरी सोडून पत्नीचा व्यवसाय वाढवण्यासाठी एकत्र आले आहेत. पुनीत फार्म्स कंपनीत चांगल्या पदावर होते. ते जवळपास 80 लाख रुपयांच्या पॅकेजवर काम करत होते. 2005 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. ते पत्नीच्या व्यवसायात भागीदार (Business Success Story) आहेत. दोघे मिळून व्यवसाय वाढवत आहेत. पूनमने सांगितले की, काही काम आम्ही दोघे मिळून करतो तर काही काम दोघेही वेगळे करतो. पूनम आता भारतातही गुंतवणूक करत आहे. त्यांनी अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.

Business Success Story Poonam Gupta

व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची कमतरता (Business Success Story)

पुनम सांगते; “काम सुरू करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही कोणाचीही मदत घेतली नाही. स्कॉटिश सरकारची योजना होती. काम सुरू करायचे असेल, तर उपकरणांसाठी एक लाख रुपयांची मदत देण्यात येत होती. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही अनुदानासाठी अर्ज केला आणि एक लाख रुपयांची मदत मिळाल्यानंतर आमचे काम सुरू झाले. आज आमची कंपनी 60 देशांमध्ये व्यवसाय करते. तसेच, आमच्या कंपन्यांची सात देशांमध्ये कार्यालये आहेत. त्याची यूएसए, चीन, भारत, इजिप्त आणि स्वीडनमध्ये कार्यालये आहेत.”

poonam gupta
पूनम आहे दोन मुलींची आई

पूनम गुप्ता म्हणाल्या की, आम्हाला दोन मुली आहेत. एक 17 आणि एक 15 वर्षांची आहे. दोघीही अजून शिक्षण घेत  आहेत. पूनम गुप्ताचे वडीलही दिल्लीत (Business Success Story) व्यापारी आहेत. पूनम ही तिच्या कुटुंबातील पहिली महिला आहे जी यशस्वी व्यवसाय करत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com