Business Success Story : अवघ्या 10 हजारात सुरु केला व्यवसाय; आज आहेत 500 कोटींचे मालक, कोण आहेत सांगलीचे अशोक खाडे?

करिअरनामा ऑनलाईन। जिद्द आणि मेहनतीचं दुसरं नाव म्हणजे अशोक खाडे. केवळ इच्छाशक्तीच्या बळावर (Business Success Story) माणूस काय काय करू शकतो हे अशोक खाडेंकडे पाहिल्यावर समजते. जीवनात अत्यंत गरिबी आणि अस्पृश्यतेमुळे मिळालेली दुय्यम वागणूक अशोक खाडेंनी पाहिली. आजच्या सुप्रसिद्ध कंपनी दास ऑफशोर इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अशोक खाडे एमडी आणि संस्थापक आहेत.

4500 लोकांना दिला रोजगार 

11 वी च्या परीक्षेदरम्यान पेनची निब बदलण्यासाठी स्वतः अशोक खाडे यांच्याकडे 4 आणे नव्हते. असं म्हणतात, या व्यक्तीच्या कुटुंबाला दोन वेळच्या भाकरीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला, पण आज या व्यक्तीच्या कंपनीचा जगभरात 500 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय आहे. खाडे यांच्या विविध कंपन्यांमध्ये 4500 लोकं काम करतात.

Business Success Story of Ashok Khade

सांगलीतील खेडेगावात घेतले शिक्षण (Business Success Story)

अशोक खाडेंच्या संघर्षाची कहाणी सत्तरच्या दशकात सुरु झाली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. पहिली ते सातवीचं शिक्षण अशोक खाडे यांच्याच गावात झालं. 8 वी ते 11 वीचं शिक्षण त्यांनी सांगलीतल्या तासगावला घेतले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले.

डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

शिक्षणासाठी मुंबईला गेल्यानंतर कुर्ल्यातील एका चाळीत त्यांनी आसरा शोधला. खोली भाडे परवडत नसल्याने ते चाळीतील पायऱ्यांच्या खालीच झोपत होते. त्याच चाळीत त्यांनी खाणावळ सूर केली. त्यांचं एफ. वाय. सायन्सचं शिक्षणही तिथेच झालं. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे अशोक यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. वडील एका झाडाखाली चांभार का  करायचे. आई 12 आण्यांमध्ये दिवसभर शेतात राबत होती. 6 बहिणी आणि भावांचे संगोपन त्या काळी फारच कठीण होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण तर दूरच राहिले. गरिबीशी झुंज देत अशोक यांचा मोठा भाऊ दत्तात्रेयने (Business Success Story) माझगाव डॉकयार्डमध्ये वेल्डिंग अॅप्रेंटिसची नोकरी स्वीकारली. त्यानंतर अशोक यांनीसुद्धा माझगाव डॉकयार्डमध्ये हँडमॅन म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि त्या बदल्यात त्यांना 90 रुपये स्टायपेंड मिळू लागला. त्यांच्या मेहनतीने त्यांनी जहाज डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले आणि नंतर काम करताना मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला.

Business Success Story of Ashok Khade

वडिलांची भविष्यवाणी ठरली खरी

माझगाव डॉकमध्ये त्यांनी चार वर्ष नोकरी केली. नोकरी करत असताना ते परदेशात जर्मनीला प्रशिक्षणासाठी गेले. तेथे त्यांच्या लक्षात आले तिथल्या लोकांना त्याच कामासाठी त्यांच्यापेक्षा 12 पटीने जास्त पगार मिळत आहे. हे खाडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी यापुढे नोकरी करायची नाही, असं ठरवलं. त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. अशोक खाडे यांनी माझगाव डॉक सोडले तेव्हा त्यांच्याकडे फक्त दहा हजार रुपये होते. व्यवसाय सुरू करत असतानाही त्यांच्याकडे जागा नव्हती. कार्यालय नव्हते. त्यांनी एका टेबलवर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी त्यांनी वडिलांचं एक वाक्य कायम स्मरणात ठेवलं. अशोक जे तुझं नेचर आहे तेच तुझं फ्युचर होणार आहे, असं वडील त्यांना नेहमीच सांगायचे.

Business Success Story of Ashok Khade

कंपनीचं नाव असं ठरलं

अशोक खाडे यांनी नोकरी सोडून एक कंपनी स्थापन केली. कंपनीच्या नामकरणाची वेळ आली तेव्हा दत्तात्रेय, अशोक आणि सुरेश या तीन भावांच्या नावाची पहिली अक्षरे जोडून (Business Success Story) त्यांनी त्या कंपनीला ‘दास ऑफशोअर इंजिनीअरिंग’ असे नाव दिले. सुरुवातीला त्यांच्या कंपनीनं समुद्रात तेल काढण्याचे प्लॅटफॉर्म म्हणून काम केले. त्यात त्यांना प्रचंड यश मिळालं आणि आज तिन्ही भावांनी मिळून आणखी अनेक कंपन्या स्थापन केल्या आहेत.

कंपनीचे 100 हून अधिक प्रकल्प पूर्ण

दास ऑफशोर ही आज एक सुप्रसिद्ध कंपनी आहे. ही कंपनी ओएनजीसी, एल अँड टी, एस्सार आणि भेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांसाठी काम करते. त्यांच्या कंपनीनं समुद्रात 100 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत.

Business Success Story of Ashok Khade

स्वीडनचे अर्थशास्त्राचे विद्यार्थी गिरवतात खाडे यांच्या यशाचे धडे

अशोक खाडे यांच्या जीवनात दोन आदर्श व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडून अशोक यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यापैकी एक मदर तेरेसा आणि दुसरे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर. आज अशोक खाडे हे केवळ देशासाठीच नव्हे, तर जगातील अशा लोकांसाठी एक उदाहरण आहे, ज्यांना त्यांच्या कष्ट आणि शिक्षणाच्या बळावर पुढे जायचे आहे. न्यूयॉर्क टाईम्सने अशोक खाडे यांच्या संघर्षाची कथाही पहिल्या पानावर प्रकाशित केली होती, म्हणून स्वीडनमध्ये आजही त्यांच्या संघर्षाची कहाणी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com