Business Success Story : ‘हा’ तरुण आहे जगातील सर्वात तरुण अब्जाधीश; अवघ्या 25 व्या वर्षी झाला 60 हजार कोटींचा मालक

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही प्रकारचे करिअर घडवत असताना (Business Success Story) नेहमीच तुमचं पुस्तकी ज्ञान तुम्हाला यशापर्यंत पोहचवत नसतं. तर तुमच्या कामातील सातत्य, तुम्ही घेत असलेली मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा यांचा अंतर्भाव किती आहे, यातून तुमचे करिअर घडत असते. त्यामुळेच शिक्षणात नापास झालेले अनेक विद्यार्थी पुढे जाऊन जगासमोर आदर्श ठरले आहेत. अशीच एक कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.

Business Success Story of Alexandr Wang

फोर्ब्सने जाहीर केलेला जगातील सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश

25 वर्षीय अलेक्झांडर वांग या तरुणाची गोष्ट साऱ्यांनाच प्रेरणा देणारी आहे. त्याने साधारण 60 हजार कोटींची कंपनी स्थापन केली आहे. त्यामुळे फोर्ब्सने जगातील (Business Success Story) सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीशांच्या यादीत अलेक्झांडरचा समावेश केला आहे. अलेक्झांडर वांग हा जगातील सर्वात तरुण स्वनिर्मित अब्जाधीश बनला आहे.

अलेक्झांडरने स्वतःच्या हिमतीवर स्केल एआय (Scale AI) ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी तयार केली आहे. अलेक्झांडर वांगने प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये प्रवेश घेतला होता. पण काही दिवसांतच त्याला अभ्यास सोडावा लागला होता. एमआयटीमधून बाहेर पडला तेव्हा अलेक्झांटरचे वय 19 वर्षे होते.

Business Success Story of Alexandr Wang

2016 मध्ये सुरु केला स्वत:चा स्टार्टअप (Business Success Story)

फोर्ब्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अलेक्झांडर वांग याने 2016 मध्ये स्टार्टअप स्केल एआयची स्थापना केली. तो त्याचा सीईओ आहे. त्यात अलेक्झांडरची 15 टक्के भागीदारी आहे. हे स्टार्टअप त्यांचा रॉ डेटा एआय आणि मशीन लर्निंगच्या गरजेनुसार इतर कंपन्यांसाठी कस्टमाइज करते. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आधारित, ही कंपनी 300 कंपन्यांना आपली सेवा पुरवते. ही कंपनी सॅटालाइट इमेजचे एनालिसिस करते. ही कंपनी युक्रेन युद्धातही सेवा देत आहे.

Business Success Story of Alexandr Wang

कमी वयात सुरु केली नोकरी

वयाच्या 17 व्या वर्षी अलेक्झांडर वांग सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंजिनीअर म्हणून पूर्णवेळ काम करत होता. तो Quora प्लॅटफॉर्मवर प्रश्नोत्तरे लिहीत असे. त्याच दरम्यान (Business Success Story) त्याने मन मशीन लर्निंगचा अभ्यास सुरु केला. वयाच्या 19 व्या वर्षी त्याने MIT मध्ये प्रवेश घेतला. पण लवकरच त्याला त्याचाही कंटाळा आला आणि Scale AI नावाचा स्टार्टअप सुरू केला.

Business Success Story of Alexandr Wang

प्रोफेसर वडलांचा मुलगा

अलेक्झांडर वांग लॉस अलामोस, न्यू मेक्सिको येथे (Business Success Story) लहानाचा मोठा झाला. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब तयार केला ते हे शहर आहे. त्याला स्लीपी टाउन असेही म्हणतात. वांगचे वडील वेपन फिजिक्सचे प्राध्यापक आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com